MFOI 2024 Road Show
  1. फलोत्पादन

Custerd Apple Variety : भारतातील सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सीताफळच्या जाती ; वाचा याविषयी

शेतकरी मित्रांनो (Farmers) अलीकडे आपल्या देशात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करू लागले आहेत. आपल्या राज्यातही शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबाग शेतीकडे वळले आहेत. महाराष्ट्रात द्राक्ष, डाळिंब,सीताफळ, पपई, यांसारख्या अनेक फळबागांची लागवड केली जाते. आता पण सिताफळ या फळांच्या काही सुधारित जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे

शेतकरी मित्रांनो (Farmers) अलीकडे आपल्या देशात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करू लागले आहेत. आपल्या राज्यातही शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबाग शेतीकडे वळले आहेत. महाराष्ट्रात द्राक्ष, डाळिंब,सीताफळ, पपई, यांसारख्या अनेक फळबागांची लागवड केली जाते. आता पण सिताफळ या फळांच्या काही सुधारित जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतात सीताफळची लागवड महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक केली गेली आहे. 92,320 टन सीताफळ एकट्या महाराष्ट्रमध्ये उत्पादित केले जाते. यामुळे सिताफळ उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. निश्चितच ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब असून यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात शेती क्षेत्रात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा:Crop Damage : बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका; केव्हा उबजारी येईल बळीराजा

महाराष्ट्रात बीड, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, जळगाव, सातारा, नाशिक, सोलापूर आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीताफळ शेती केली जाते. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये सीताफळची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

असे असले तरी उर्वरित महाराष्ट्रातही थोड्याफार प्रमाणात का होईना सीताफळाची झाडे बघायला मिळतात. रोजगार हमी योजनेशी संबंधित फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 25906 हेक्टर क्षेत्रात सीताफळची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.  मराठवाड्यातील धारूर आणि बालाघाट ही गावे सीताफळसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यामुळे आज आपण सिताफळाच्या काही प्रगत जाती जाणून घेऊया.

हेही वाचा : Tomato Farming : विदर्भातील नवयुवक शेतकऱ्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग!! उन्हाळी टोमॅटोची यशस्वी लागवड

सीताफळच्या काही सुधारित जाती- सिताफळच्या जातींचे वर्गीकरण ठिकाण, फळाचा आकार, रंग, बियांचे प्रमाण यानुसार केले जाते. सीताफळच्या अस्सल जातींचा अभाव अजूनही आहे, मुख्यत: बियाणे प्रसारामुळे हा अभाव असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक स्पष्ट करतात. तरीदेखील भारतातील काही सिताफळाच्या प्रगत जाती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

»बालानगर: झारखंड राज्यासाठी ही एक योग्य जात आहे.  या जातीच्या सीताफळची फळे हलक्या हिरव्या रंगाची असतात. या जातीच्या फळांमध्ये बियांची संख्या जास्त असते. जाणकार लोकांच्या मते या जातीच्या एका झाडापासून सुमारे 5 किलो फळे मिळू शकतात.

»अर्का सहान: सीताफळची ही एक संकरित जात आहे, ज्याची फळे इतर फळांच्या तुलनेत गुळगुळीत आणि गोड असतात. अर्का सहान ही सीताफळाची संकरित जात आहे. या जातीची फळे खूप रसाळ असतात आणि हळूहळू पिकतात. या जातीच्या फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी आणि आकार लहान असतो. त्याचा लगदा आतून बर्फासारखा पांढरा दिसतो.

»लाल सीताफळ : सीताफळच्या या वाणाची फळे लाल रंगाची असतात आणि प्रति झाड प्रति वर्ष सरासरी 40 ते 50 फळे येतात. या जातीची शुद्धता बियाणे उगवल्यानंतरही बर्‍याच प्रमाणात टिकते.

»मॅमथ: या जातींचे उत्पादन लाल कस्टर्ड सफरचंदापेक्षा जास्त असते. ही जात प्रति झाड प्रति वर्ष सुमारे 60 ते 80 फळे देते. लाल कस्टर्ड सफरचंदाच्या तुलनेत या जातीच्या फळांमध्ये बियांची संख्या कमी असते. मॅमथचे वाण उत्पादन व गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम असल्याचे आढळून येते.

हेही वाचा : मोठी बातमी! वाडा तालुक्यात आयोजित होणार कोकणातलं पहिलं कृषी प्रदर्शन; नितीन गडकरी असणार उद्घाटक

English Summary: Custerd Apple Variety: India's highest yielding custard apple variety; Read about it Published on: 25 April 2022, 03:47 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters