केळीमध्ये कंद पोखरणाऱ्या सोंड किडीमुळे (कॉस्मोपॉलिटस सॉर्डिकस) झाडे कोलमडून पडून झाडांची संख्या कमी होते. या भुंग्याची अळी कंदामध्ये राहून केळीचे कंद पोखरून आतील भाग खाते. कंदामध्ये पोखरत उभे-आडवे बोगदे तयार करते. त्यामुळे कंदातील उती कुजतात व कंद सडतो. या बोगद्यांचे प्रमाण वाढल्यास मुळांपासून मिळणारे अन्नद्रव्य मिळण्यात अडचणी येतात. केळीचा जोम कमी होऊन झाड मरते. किंवा जमिनीच्या पृष्ठभागापासून कोलमडून पडते.
नियंत्रण उपाय
शेतातील धसकटे व इतर पालापाचोळा वेचून जाळून टाकावा किंवा जमिनीत गाडून टाकून शेत स्वच्छ करून घ्यावे.
लागवडीसाठी निरोगी, कीडमुक्त कंदाची निवड करावी.
कंद स्वच्छ पाण्याने धुऊन क्लोरपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 25 मिली + कार्बन्डाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
निबोळी पेंड 500 ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात जमिनीत मिसळून घ्यावे.
कार्बोफ्युरानची 20 ग्रॅम भुकटी प्रतिझाड तिसऱ्या, पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीत मिसळून द्यावी.
सापळा ः प्रौढ भुंगेरे व अळ्यांना आकर्षित करण्यासाठी काढणी झालेल्या झाडाच्या ताज्या कापलेल्या खुंटावर कंदाची तबकडी वा खोडाचा तुकडा ठेवावा. दोन दिवसांनंतर हे सापळे त्यात जमा झालेल्या भुंगेऱ्यांसहित नष्ट करावेत.
सर्वेक्षणासाठी 30 सें.मी. आकाराच्या बुंध्यांचे सापळे 10 ते 15 प्रति एकरी या प्रमाणात वापर करावा.
कंपोस्ट खत बनवण्याची सोपी पद्धत, वाचा पूर्ण लेख
कंद पोखरणाऱ्या भुंग्याचा अधिक प्रादुर्भाव असल्यास सापळ्यांचे प्रमाण वाढवावे. जैविक कीड नियंत्रणासाठी बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीचा किंवा हेटेकोहृयाबिटीस इंडिका या सूत्रकृमीचा प्रतिसापळ्यावर 20 ग्रॅम या प्रमाणात वापर करावा. हे सापळे झाडांच्या बुडाशी जमिनीवर ठेवावेत.
कासमिल्यूर वापरलेल्या कामगंध सापळ्याचा प्रतिहेक्टरी 5 या प्रमाणात वापर करावा. या कामगंध सापळ्याची जागा प्रत्येक महिन्यात बदलावी.
या किडीचा बागेत अधिक प्रादुर्भाव असल्यास खोडवा पीक टाळावे. तसेच प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास खोडवा पीक घेताना पूर्वीच्या कापलेल्या बुंध्यांवर क्लोरपायरीफॉम 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
घरच्या घरी मोत्याची शेती: घरातूनच मोत्यांची शेती सुरू करा, तुम्हाला बंपर मिळेल
केळीच्या घडावर किती फण्या ठेवाव्यात याचे एक सर्वसाधारण सूत्र;
झाडाच्या बुंधा/ पेंधा चा खालून गुठलीच्या वर घेर मोजणे( इंचामध्ये).म्हणजे जमिनीपासून साधारण ५ -७ सेमी उंचीवर किती इंचाचा घेर/जाडी आहे, त्याला ४ ने भाग घ्यायचा, जेवढे उत्तर येईल तेवढया फण्या ठेवाव्यात.उदा. बुंध्याचा घेर= ४o इंच असेल तर ४o ÷ ४= १o फण्या ठेवणे.याप्रमाणे बारीक झाड २४ इंचाचे असेल तर ६ फण्या ठेवणे.
महत्वाच्या बातम्या;
सूर्यफुलाची पेरणी अशा पद्धतीने करा, मिळेल जास्त उत्पादन...
लाल बटाट्याची शेती कमवून देईल लाखो रुपये, वाचा सविस्तर..
कांदा पिकातील तण काढण्याचे मार्ग
Share your comments