कल्पवृक्ष म्हणून ओळख असणाऱ्या नारळच्या देखील शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सतत बदलणारे वातावरण आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नारळाची शेती संकटात सापडली आहे. उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे नव्या संकटाला तोंड फुटले आहे. या झाडांवर किडआळीचा प्रादुर्भाव वाढल्याने नारळ उत्पादनात घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे नारळाची शेती अडचणीत येऊ नये याकरिता बारामती कृषी विज्ञान केंद्राने या समस्येवर वेळीच प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर याबाबत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनशिबीर देखील हाती घेण्यात आली आहे. कोकणात सर्वाधिक नारळाची शेती केली जात असून नारळाच्या लागवड क्षेत्रासह उत्पादनात राज्याचा समावेश पहिल्या दहा राज्यांमध्ये आहे. तर सध्या राज्यातील विविध जिल्हांमध्ये देखील नारळ शेतीचा प्रयोग सुरु असून नारळ लागवडीचे क्षेत्र राज्यात झपाट्याने वाढत आहे. मात्र अशात किडअळी प्रादुर्भावाने संबंधित शेतकरी अडचणीत सापडला आहे.
हा किडीचा प्रकार प्रथम झाडांच्या झावळ्या पोखरण्याचे काम करतो. परिणामी झावळ्या सुकून प्रकाश संश्लेषण क्रियेअभावी उत्पादनात घट येते. नारळाच्या खालच्या बाजूच्या पानांवर सुकलेले ठिपके पडतात तर प्रादुर्भाव वाढल्यास पाने जळून मोठे नुकसान होते. शिवाय या किडीचा प्रादुर्भाव लहान मोठ्या सर्व नारळाच्या झाडांवर होत आहे. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने झावळ्या, मोहोर आणि अपरिपक्व नारळाची फळे गळण्याचे प्रमाण वाढते.
या समस्येवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय जोजना राबविण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. अधिक प्रादुर्भाव पसरू नये म्हणून उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीलाच प्रथमतः प्रादुर्भावग्रस्त आढळणारी पाने कापून जाळवीत. रासायनिकरित्या फ्रॉन्ड्सच्या खालच्या पृष्ठभागावर मॅलेथिऑन 50 EC0.05% (1ml/lit), क्विनॅलफॉस 50 EC0.05%(1ml/lit) यांची फवारणी केल्यास प्रादुर्भाव आटोक्यात येतो. नारळावरील या अळीला परजिवीकरण करताना गोनिओझस मित्र किटकांचा वापर करावा.
अळ्या परोपजीवींमध्ये, बेथिलिड, गोनिओझस नेफॅंटिडिस आणि ब्रॅचिमेरिया नोसाटोई-केएयू हे कीड नियंत्रित करण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत. यामुळे काही विशिष्ट्य प्रकारे जर तुम्ही याकडे लक्ष दिले तर यावर देखील चांगला उपाय सापडून आपले उत्पादन वाढण्यास त्याठिकाणी मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
भगवंत मान सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, शेतकऱ्यांची मोठी मागणी केली मान्य...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, साखर उद्योग अभ्यासासाठी कृतिदल समितीची स्थापना
जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने झाला मोठा निर्णय
Share your comments