1. फलोत्पादन

असे करा नारळ पिकातील अन्नद्रव्यांचे व पाण्याचे व्यवस्थापन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
coconut fertilizer management

coconut fertilizer management

 नारळ हे बागायती फळ झाड असून पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजे समुद्र किंवा नदीकाठच्या रेताळ, वरकस व मुरमाड  तसेच मध्यम, भारी आणि अति भारी जमिनीत देखील लागवड करता येते. परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशा पाणथळ जमिनीत नारळाची लागवड करावयाची असल्यास अशा जमिनीत चर काढून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते.

 त्याचप्रमाणे नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते. अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरला यावर म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागवड करावी. या लेखात आपण नारळ पिकातील अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि त्यांची व्यवस्थापन तसेच पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत.

 नारळाचे पाणी व्यवस्थापन

 • नारळ पिकास पाण्याचा जास्त ताण पडल्यास माध्यम फुलांची गळ होते व फळ धारणेवरती त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. त्याकरिता बागेत पुरेसा ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे.
 • पाणी देण्यासाठी बुंध्याजवळ दीड ते दोन मीटर अंतरावर गोलाकार किंवा चौरस आळे करून पाणी द्यावे. जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल व त्याद्वारे पाणी द्यायचे असेल तर त्यासाठी वरील प्रमाणे अंतरावर गोलाकार किंवा चौरस लॅटरल पाईप टाकून त्याला किमान पाच ते सहा ड्रीपर लावावेत.
 • लहान रूपास प्रतिदिन 10 लिटर पाणी द्यावे. मोठ्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ऑक्‍टोबर ते जानेवारीमध्ये प्रति दिन 30 लिटर पाणी द्यावे. फेब्रुवारी ते मे पर्यंत प्रति दिन 40 लिटर पाणी आवश्यक असते.

 

नारळ पिकासाठी खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचे योग्य नियोजन केल्यास फायदा होतो. आता नारळ पिकाच्या  अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी पाहू.

 नारळ पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे?

 • नारळ फळपिकाच्या एक वर्षाच्या झाडांना खते देण्यासाठी बुंध्यापासून 30 सेमी अंतरावर, 30 सेंटिमीटर रुंद व 30 सेंटिमीटर खोल गोलाकार चर द्यावा. चरामध्ये शेणखत, रासायनिक खत यांचे मिश्रण टाकावे. चर मातीने बुडवून पाणी द्यावे. रुपेश जशी मोठे होतील तसेच चर बुंध्यापासून दूर घ्यावा. पाच वर्षावरील झाडांसाठी दीड मीटर अंतरावर चर द्यावा.
 • साधारणपणे एक वर्षाच्या झाडाला 10 ते 15 किलो शेणखत किंवा गांडूळखत,500 ग्रॅम युरिया,600 ग्रॅम सुपर फॉस्फेटव 320 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. या प्रमाणामध्ये खताचे प्रमाण वाढवावे व पाच वर्षांपूर्वी झाडाला 50 ते 70 किलो शेणखत किंवा गांडूळखत, 2500 ग्रॅम युरिया, 3000 ग्रॅम सुपर फॉस्फेट व सोळाशे ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
 • जर संकरित जात असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश पालाशची मात्रा दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 • शेणखत पूर्ण व सुपर फास्फेट

 एकाच हप्त्यात जून महिन्यात द्यावे. युरिया व म्युरेट ऑफ पोटॅश तीन समान हप्त्यात जून, सप्टेंबर व फेब्रुवारी मध्ये विभागून द्यावी.

5-

नारळाच्या चांगल्या वाढीसाठी दर सहा महिन्याला 50 ग्रॅम ऍझोस्पिरीलम, 50 ग्रॅम फोस्पॉ बॅक्टेरिया, 50 ग्रॅम व्ही ए एम जैविक खते शेणखतामध्ये एकत्र करून मुळांजवळ द्यावीत.जैविक खतांमध्ये रासायनिक खते मिसळू नयेत.

 • माती परीक्षणानुसार झाडास दिड किलो सूक्ष्म द्रव्याचे मात्रा तीन समान हप्त्यांत द्यावी. पहिला हप्ता जून मध्येतर दुसरा हप्ता आक्टोबर आणि तिसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा.

 

नारळाच्या बागेत आच्छादन

 • नारळ बागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे ओलावा टिकून राहतो व फळांच्या उत्पादनात सातत्य राहते.
 • नारळाच्या झावळ्यांच्या आच्छादन करता येते.यासाठी झावळ्या दोन ते तीन भागात तोडून देठ बाजूला काढावे. या झावळ्या बुंध्यात सर्वत्र गोलाकार पसरावेत.
 • तसेच आच्छादन या करिता मल्चिंग पेपरचा वापर करता येतो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters