1. फलोत्पादन

Gauvha veriety: पेरू फळाच्या बंपर उत्पादनासाठी उपयुक्त आहेत या पेरूच्या विविध जाती

पेरू हे एक गोड तसेच आंबट फळ म्हणून ओळखले जाते.पेरू फळाची झाडे उष्ण हवामानात वाढत असतात.पेरूचा रंग आत मधून पांढरा किंवा लालसर असतो जर कच्चा पेरू असेल तर त्याचा आतील गाभा सुद्धा परिपक्व झालेला नसतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
taiwan pink gauvha

taiwan pink gauvha

पेरू हे एक गोड तसेच आंबट फळ म्हणून ओळखले जाते.पेरू फळाची झाडे  उष्ण हवामानात वाढत असतात.पेरूचा रंग आत मधून पांढरा किंवा लालसर असतो जर कच्चा पेरू असेल तर त्याचा आतील गाभा सुद्धा परिपक्व झालेला नसतो.

परिपक्व असलेला पेरूचा बाहेरचा रंग पिवळा तर आत मधील गाभा मऊ झालेला असतो. खातांना त्याची चव सुद्धा गोड असते. आता बरेच शेतकरी पेरू लागवडीकडे वळत आहेत. पेरूच्या विविध प्रकारच्या जाती असून यातील कोणत्या जाती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. अशा जातींविषयी या लेखात आपण माहिती घेऊ.

 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पेरूच्या जाती

  • तैवान पिंक पेरू- बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान होय. साधारणपणे या पेरूचे वजन 500 ग्राम असते.आकाराने हा पेरू मोठा असतो. या पेरू चे वैशिष्ट्य म्हणजे हा आत मधून फिकट गुलाबी रंगाचा असतो
  • लखनऊ ( लखनवी) पेरू- बाजारात चांगल्या प्रकारे मागणी असलेल्या पेरू म्हणजे लखनवी पेरू होय. हा पेरू पिंक तैवान पेरू पेक्षा सर्वसाधारण गोड स्वरूपाचा आहे. मागील काही वर्षांपासून लखनवी पेरूला चांगली मागणी असल्याचे दिसून येते. लखनवी पेरूची भाजी सुद्धा केली जाते.जीचवीला सुद्धा स्वादिष्ट असते. गोवा राज्यात तर लखनवी पेरू पासून आईस्क्रीम तसेच नाताळच्या दिवशी बर्फी करून वाटली जाते.
  • बनारसी- पेरूची ही जात अत्यंत गोड असते तसेच आंबटपणा कमी असतो. या जातीची झाडे सुद्धा जोमाने वाढतात तसेच त्यांची उंची पाच ते साडेपाच मीटर असते.
  • या जातीची फळे गोल आकाराची व पिवळ्या रंगाचे असतात. या जातीचा पेरू टिकायला मध्यम असते.
  • हरिझा- हरीझा जातीचे फळ मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. या जातीचे झाड सर्वसामान्य साडेतीन मीटर एवढ्या उंचीचे असते. या जातीची फळे हिरवट तसेच पिवळ्या रंगाचे असतात.या जातीचा पेरू जास्त गोड असतो तसेच टिकण्यास सुद्धा चांगला असतो.
  • लाल पेरू- लाल पेरू या जातीच्या आकाराचे फळे मध्यम आकाराची असतात. ही जातीची फळे उत्तर कोकण आणि मुंबई च्या भागात जास्त आढळतात. या जातीच्या फळांचा गर कडक असतो.
English Summary: benificiaal veriety of gauvha orchred that give more production Published on: 02 January 2022, 06:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters