सोलापूर(solapur) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गोरमाळे या एका छोट्याश्या गावातून(village) शेतीत केलेली सीताफळे चक्क परदेशात निर्यात होतात खरच हे खूपच अभिमानास्पद बाब आहे.गोरमाळे सारख्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेले आणि शेतकरी कुटुंबात वावरलेलं डॉ. नवनाथ यांनी आपल्या शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घरचीच पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळे काहीतरी करण्यासाठी संशोधन सुरू केले. त्यासाठी ते शेतीमध्ये रोज नवनवीन प्रयोग करत होते.
सीताफळाच्या नवीन वाणाचा शोध लावला:
सीताफळासारख्या (custard apple) दुर्लक्षित फळावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित करून आणि योग्य प्रकारे संशोधन करून त्यांनी ‘एनएमके’ या सीताफळाच्या नवीन वाणाचा म्हणजेच जातीचा शोध लावला.अश्याच प्रकारे अपार मेहनत करून तसेच अनेक वर्ष संशोधन करुत त्यांनी सीताफळांच्या एकूण 42 वाणांचा शोध लावला. संशोधित वाणापैकी सर्वात लोकप्रिय झाले ते म्हणजे एनएमके या वाणाचे सीताफळ आणि त्यामुळे एनएमके या सीताफळाच्या जातीच त्यांना पेटंट मिळाले आहे.त्यामुळे त्यांच्या सीताफळाची मागणी संपूर्ण जगभर वाढली त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशिक्षण केंद्रे सुद्धा उभा केली.
हेही वाचा:अंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड
डॉक्टर नवनाथ म्हणाले की, गेल्यावर्षी ‘एन.एम.के. वन गोल्डन’ वाणाची युरोपीयन देश लंडनमध्ये सहाशे रुपये किलो दराने सीताफळाची विक्री झालेली आहे. त्यामुळं शेतकर्यांचा सर्व खर्च वजा करता शेतकरी वर्गाला प्रति किलो सिताफळामागे 150 रुपये एवढा नफा मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात जागतिक बाजारपेठेमध्ये सीताफळ उत्पादनास मोठी संधी आणि मागणी मिळणार आहे.
सीताफळा पासून विविध पदार्थ निर्मिती:-
सीताफळ हे एक बहुगुणी फळ आहे त्यामुळे बाजारात सुद्धा सिताफळाला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे त्याच बरोबर सीताफळाचा उपयोग करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये आईस्क्रिम, ज्यूस, शेक इत्यादी आदी वेगवेगळे आणि महागडे पदार्थ तयार केले जातात. तसेच सीताफळ हे फळ जास्त दिवस आपण टिकवून ठेऊ शकतो. कमीत कमी सीताफळाची साठवून आणि टिकवणं क्षमता ही 1 वर्ष एवढी असते त्यामुळेसुद्धा सिताफळाला मोठी मागणी आहे.त्यामुळे आपल्या देशात सीताफळाची मागणी भरपूर असून सुद्धा आता परदेशातही अलीकडे सीताफळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. शेतकर्यांनी सीताफळ लागवड करून आणि योग्य प्रकारे नियोजन करून सुद्धा लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन शेतकरी राजा भरपूर नफा मिळवू शकतो.
Share your comments