फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान देत आहे. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ आवळा, कागदी लिंबू व मोसंबी या फळझाडांची कलमे शेतकरी लागवड (cultivation) करू शकतात. त्याचबरोबर यासाठी लागणाऱ्या ठिबक सिंचनासाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येते.
या आहेत योजनेच्या अटी
वैयक्तीक शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग (Bhausaheb Phundkar Orchard) योजनेचा लाभ घेता येतो. तसेच यात अनुदानाची मर्यादा ही १०० टक्के आहे. लाभार्थ्यांस एकूण ३ वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० प्रमाणे अनुदान देय होईल. पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी फळबाग जगविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते.
माहितीनुसार, फळबाग लागवडीसाठी कलमची निवड स्वतः करावयाची असून कलमे खरेदी करतांना कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, नामांकित खासगी व कृषि विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकांना प्राधान्य दिले जाईल.
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
योजनेअंतर्गत लाभ
1) आंबा फळबाग - अंतर ५x५, हेक्टरी झाडे ४००- अनुदान - १ लाख १ हजार ९७२ रुपये.
2) पेरू फळबाग - अंतर ३x२, हेक्टरी झाडे १६६६- अनुदान - २ लाख २ हजार ९० रुपये, अंतर ६x४, हेक्टरी झाडे-२७७, अनुदान- ६३ हजार २५३ रुपये.
3) संत्रा फळबाग - अंतर ६x३, हेक्टरी झाडे ५५५ - अनुदान - ९९ हजार ७१६ रुपये.
4) संत्रा, मोसंबी, लिंबू फळबाग - अंतर ६x६, हेक्टरी झाडे २७७- अनुदान - ६२ हजार ५७८ रुपये.
5) सीताफळ फळबाग - अंतर ५x५, हेक्टरी झाडे ४००- अनुदान - ८३ हजार ६३१ रुपये.
6) आवळा फळबाग - अंतर ७x७, हेक्टरी झाडे २००- अनुदान - ४९ हजार ७३५ रुपये.
मोदी सरकारने आखला मोठा प्लॅन! बी-बियाणे, खते व माती परीक्षणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
ऑनलाईन संकेतस्थळ:
dbt.mahapocra.gov.in या वेबसाइटवर जावून तुम्ही माहिती देखील घेऊ शकता. तसेच अधिक माहितीसाठी-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
इफको-एमसी क्रॉप सायन्स हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे..
Share your comments