पिकाच्या आणि फळबागांच्या भरघोस उत्पादनासाठी विविध प्रकारच्या पोषक घटकांची गरज असते व ही गरज विविध प्रकारचे रासायनिक खते तसेच विद्राव्य खतांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये फळबागांसाठी संजीवकांचा वापर हा खूप महत्त्वाचा असतो. फळबागामध्ये संजीवकांचा वापराचे फायदे नेमके काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:Coconut Farming: नारळ शेतीतील संधी आणि नारळाच्या उत्पादनाचे महत्त्व,वाचा महत्वाची माहिती
संजीवके म्हणजे काय?
सजीव वनस्पतींमध्ये जी रासायनिक द्रव्य प्रमाणामध्ये कार्यरत होऊन त्या वनस्पतीच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात त्यांना वनस्पती संजीवके म्हणतात. संजीवकांचे वाढ प्रेरक आणि वाढ निरोधक असे दोन मुख्य प्रकार आहेत.
फळझाडांमध्ये संजीवकांचे उपयोग
1- वनस्पतीमध्ये अभिवृद्धी करण्यासाठी- जेव्हा आपण कलमा करतो तेव्हा फाटे व गुटी कलमांना लवकर आणि भरपूर मुळे येण्यासाठी संजीवकांचा वापर होतो. शेंडा कलम, भेट कलम आणि डोळा भरणे या कलम पद्धतीत खुंट आणि सायन यांचे मिलन साधून एकजीव होण्यासाठी संजीवके मदत करतात. कलमे जगण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील संजीवकांचा उपयोग होतो..
नक्की वाचा:Important: 'संत्रा फळगळ'होण्यामागील ही आहेत प्रमुख कारणे, वाचा आणि समजून घ्या
2- फळांचा बहर नियंत्रित करण्यासाठी- फळांमध्ये फुलांचा बहर येण्याअगोदर झाडांची शाखीय वाढ पूर्ण व्हावी लागते. वनस्पतीच्या अंतर्गत शरीरक्रिया आणि बाह्य वातावरण यांच्या एकत्रित परिणामामुळे शाखिय वाढ पूर्ण होण्यासाठी कमी अधिक वेळ लागतो.
शाखीय वाढ होऊन ती पक्व झाल्यावर डोळ्यात फुलांची निर्मिती होते. ही निर्मिती काही काळ सुप्तावस्थेत राहते आणि ठराविक कालावधीनंतर डोळ्यातून फुलांचा मोहर बहराच्या रुपाने बाहेर पडण्यासाठी फळझाडांची अंतर्गत स्थिती आणि बाह्य वातावरणातील वातावरणातील सूर्यप्रकाश, आद्रता आणि तापमान या घटकांचा समन्वय साधण्यासाठी संजीवकांचा वापर होतो.
3- झाडांच्या आकार मर्यादित राखण्यासाठी व उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी- बऱ्याचदा आपण पाहतो की फळ झाडांचा विस्तार जास्त मोठा होतो व त्यावर फळे खूप कमी लागतात.
झाडांची वाढ झाल्यामुळे फळांची निगा राखणे व काढणे या गोष्टीदेखील अडचणीच्या होतात. अशा मध्ये झाडांची वाढ आणि विस्तार मर्यादित राखण्यासाठी मॅलिक हायड्रोझाईन क्लोरमक्वाट इत्यादी संजीवके उपयुक्त ठरतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळझाडांच्या मर्यादित वाढ आणि विस्तारामुळे दर हेक्टरी झाडांची संख्या वाढवून घेता येते आणि उत्पादन क्षमता वाढते.
4- फळपिकांचा काटकपणा आणि उत्पादन क्षमता- फळबागांमध्ये संजीवकांचा वापर करून झाडांना काटकपणा तसेच उत्पादनाची सुरुवात लवकर करता येते. आपल्याला माहित आहेच कि बरीच फळझाडे बहुवर्षीय असल्यामुळे सुरुवातीचे काही वर्षे फक्त त्यांची शाखीय वाढ होत असते.
ही वाढ होत असताना संजीवकांचा वापर केला तर शाखीय वाढीवर मर्यादा येऊन फळे येण्याची व्यवस्था लवकर सुरू होते. शाखीय वाढ होत असताना शाखात लुसलुशीतपणा असतो व त्यामुळे हा भाग विशेष हवामानातील पाणीटंचाई किंवा रोग व किडींना लवकर बळी पडतो. परंतु संजीवकांचा वापर केल्यावर हा भाग कणखर बनतो.
Share your comments