- पोटॅशियम शोनाइट हे उत्पादन पोटॅशियम मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांच्या डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात 100 % विद्राव्य असल्याने जमिनीमधून ड्रिप मधून किंवा फवारणीतून वापरता येते.
- यात 23 % पोटॅश 100% मॅग्नेशियम व 15 % गंधक हे अन्नद्रव्य आहेत .
- कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळातमॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात लागते.कारण पिष्टमय पदार्थ वस्टार्च यांच्या चयापचयाच्याक्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्यांचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वालिटी यांच्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.
- पक्वता पूर्व स्थितीनुसार शिफारसीनुसार पोटॅशियम शेनाईट चा जमिनीमधून ड्रिप मधून किंवा फवारणी तून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखर निर्मिती व फळांचे फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतात.
- पोट्याश मुळे फळे व भाजीपाला पिकाची फुगवण तर होतेच पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्याची कार्यक्षमता मॅग्नेशियम मुळे अबाधित राहते.
- वापरण्याचे प्रमाण :-
जमिनीतून – फळे व भाजीपाला पिकासाठी फळांची सेटिंग झाल्यावर एकरी 25 किलो एकदा द्यावे.
ड्रिप मधून– फळे व भाजीपाला पिकाच्या तसेच तोडण्याच्या काळात एकरी तीन ते पाच किलो दर आठवड्याला चार वेळा सोडावे.
फवारणीतून – ड्रिप ची सोय नसल्यास भाजीपाला पिकाच्या पकवतेपूर्वी तसेच तोडणीच्या काळात फवारणी करावी.( संदर्भ-krushiworld)
Share your comments