महिलांना मासिक पाळीच्या काळात खूप वेदना होतात. कधीकधी वेदना असह्य होऊन जातात. मासिक पाळीत चिडचिड होणे, कंबर दुखणे यांसारख्या अनेक गोष्टी घडत असतात. मासिक पाळीतील वेदना, कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बऱ्याचदा त्या उपायांचा काहीच फरक पडत नाही. पोट दुखी कमी करण्यासाठी गोळ्या देखील घेतल्या जातात मात्र त्याचा तात्पुरताच फरक पडतो.
मासिक पाळीत योग्य आहाराची गरज असते. तर आजच्या या लेखात मासिक पाळीत कोणता आहार घ्यावा म्हणजे तुम्हाला आराम मिळेल याबद्दल जाणून घेणार आहोत.
1. हिरव्या भाज्या -
मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात रक्त कमी होते आणि रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरात लोहाची कमतरता सुरू होते. परिणामी शरीर सुस्त होऊ लागते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या महिलेला जास्त थकवा जाणवत असेल तर तिला जास्त वेदना होतात. अशावेळी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. कारण त्यात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते.
आता शेतातली कामे होणार झटपट; मराठमोळ्या जोडप्याने तयार केले आगळे वेगळे मशीन
2.दही-भात -
ज्या महिलांना मासिक पाळीत जास्त वेदना होतात, अशा महिलांनी दही-भाताचा आहारात समावेश करावा. दही आणि भातासोबत हिरव्या भाज्यांचादेखील समावेश करावा. तुम्ही मासिक पाळीच्या काही दिवस आधीही दही-भाताचे सेवन करू शकता. त्याचादेखील फायदा होऊ शकतो.
3. केळी, अननस आणि किवी -
केळीमध्ये व्हिटॅमिन बी6 आणि पोटॅशियम अधिक प्रमाणात असते. हे सूज आणि पीरियड क्रॅम्प्सपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. जर तुम्ही स्मूदी बनवत असाल तर त्यात अननस आणि किवीचा देखील समावेश करू शकता. अननसात ब्रोमेलेन एंजाइम असते जे सूज कमी करण्यासाठी प्रयत्न करते.
Cotton Seeds : राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकरी परराज्यात
4. अंडी -
अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई असते जे पीएमएसच्या लक्षणांशी लढण्यास सक्षम असतात. शिवाय अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाणही अधिक असते. क्रॅम्प्स टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने मासिक पाळीच्या दरम्यान दररोज अंडी खाल्ली पाहिजेत.
5. चॉकलेट -
डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम तसेच फायबर असते. हे पीएमएसशी लढण्यास व वेदना कमी करण्यास मदत करते. मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी, 85% किंवा अधिक कोको असलेली चॉकलेट निवडावीत.
महत्वाच्या बातम्या:
वजन कमी करताना चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन; तज्ञांनी सांगितले नुकसान
Share your comments