1. आरोग्य सल्ला

पोटात कळ येते? या उपायाने चुटकीसरशी थांबेल पोटात कळ येणे

पोटात कळ येणे याचे सोंग करून आपण सर्वांनी एकदा तरी आपल्या शाळेला सुट्टी घेतली असेल. पोटात कळ जाणवते याचा अनुभव आपण अगदी लहानपणापासून एकदातरी अनुभवलेला असेलच. पोटात कळ येणे यालाच पोट दुखणे सुद्धा म्हटले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this remedy is useful in stomach pain

this remedy is useful in stomach pain

 पोटात कळ येणे याचे सोंग करून आपण सर्वांनी एकदा तरी आपल्या शाळेला सुट्टी घेतली असेल. पोटात कळ जाणवते याचा अनुभव आपण अगदी लहानपणापासून एकदातरी अनुभवलेला असेलच. पोटात कळ येणे यालाच पोट दुखणे सुद्धा म्हटले जाते.

अनेक वेळा बाहेरचे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या पोटात सारखे कळ येणे अशा समस्या उद्भवतात पोटात कळ येते अश्या समस्या आपल्याला पावसाळा या ऋतु मध्ये अतिप्रमाणात जाणवतात. पावसाळ्यात हवामानात होणारे बदल तेव्हा पावसात खाल्लेल्या कुठल्याही बाहेरच्या पदार्थामुळे आपल्याला पोटात कळ जाणवते अशा समस्या निर्माण होतात.

नक्की वाचा:बातमी कामाची! देशी गाई संभाळा आणि लाखो कमवा, ३३ प्रकारची अन्नद्रव्ये होतात तयार, वाचा सविस्तर

 पोटात कळ येऊ लागली की आपल्याला त्या वेदना सहन होत नाही. पोटामध्ये कळ येणे हा त्रास अतिशय त्रासदायक असतो. अनेकदा पोटामध्ये कळ येणे या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळेहा त्रास आणखी वाढू शकतो आणि हा त्रास नंतर इतका वाढतो की आपल्याला उभे राहताना सुद्धा त्रास होतो.

 अनेकदा पोटात कळ येणे हा त्रास थांबवण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्यांचा आधार घेतला जातो. पण त्यामुळे ही कधीकधी पुरेसा फरक पडत नाही. पण पोटात कळ येणे या समस्येवर तुम्ही घरगुती उपाय करून पोटामध्ये कळ येणे या समस्येपासून आराम मिळवू शकतो.

  • पोटात कळ येण्याची कारणे :

 तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोटामध्ये कळ येणे याचे मुख्य कारणे कोण कोणते आहेत आणि यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते करावे चला तर मग बघुया!

1) दूषित पाणी पिणे:

 पोटात कळ येणे याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छ पाणी न पिणे. अनेक वेळा पाण्यात उपलब्ध असलेला गाळ किंवा दूषित पाणी पिल्याने आपल्याला पोटामध्येकळ येणे अशा समस्या उद्भवतात. दूषित पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरात बॅक्टेरिया चे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आपल्याला पोटामध्ये कळ येणे किंवा पोट दुखणे अशा समस्या निर्माण होतात.

2) शिळे अन्न खाणे:

 अनेकदा रात्री किंवा दिवसा उरलेले जेवण वाया जाऊ नये म्हणून आपण ते दुसऱ्या दिवशीसुद्धा खातो. पण हेच शिळे अन्न खाणे आपल्याला महागात पडू शकते. शिळे अन्न खाणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. पोटात कळ निर्माण होणे किंवा पोट दुखी होण्यासाठी अनेकदा शिळे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे जंतू आपल्या पोटात जातात. आणि यामुळे आपल्याला पोटामध्ये कळ निर्माण होणे अशा समस्या उद्भवतात.

नक्की वाचा:आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज

3) अति प्रमाणात तिखट पदार्थ खाणे:

 अनेक लोकांना अति प्रमाणात तिखट खाण्याची सवय असते. पण हीच सवय त्यांना घातक ठरू शकते. अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला पोटात कळा निर्माण होणे किंवा पोट दुखणे अशा समस्या निर्माण होतात. अति प्रमाणात तिखट खाल्ल्यामुळे आपल्या पोटातील उष्णता वाढते. आणि यामुळे आपल्याला पोटात कळ निर्माण होणे अशा समस्या निर्माण होतात.

  • पोटात येणारी कळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय :

1) ताजे अन्न खावे :

 पोटात कळ येणे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिळे पदार्थसेवन करणे. अनेकदा शिळ्या पदार्थाचे सेवन केल्यामुळे आपल्या पोटात वेगवेगळ्या जंतूंचा शिरकाव होतो. आणि यामुळे आपली पचनक्रिया सुद्धा बिघडते. आणि आपल्याला पोटामध्ये कळ येणे पोट दुखणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नेहमी ताजे अन्न खावे. त्याचबरोबर शिळ्या अन्नाचे सेवन करू नये. ताजे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे पोषकतत्वे मिळतात. त्यामुळे पोटामध्ये कळ येणे या समस्येला जर तुम्हाला सामोरे जायचं असेल तर ताजे अन्न खावे.

2) आल्याचा रस घ्यावा :

 जर तुमच्या पोटात येणारे कळ ही थांबत नसेल किंवा तिचा त्रास अधिक प्रमाणात वाढत असेल तर आल्याचा रस घ्यावा. उकळत्या पाण्यामध्ये आल्याचा तुकडा किसून ते पाणी चांगले गरम करावे आणि नंतर हे पाणी गाळून घ्यावे. नंतर या पाण्यामध्ये थोडेसे मध टाकावे आणि या पाण्याचे सेवन करावे. असे दोन-तीन दिवस गेल्यामुळे पोटात कळ जाणवते या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

3) जिऱ्याचे पाणी प्यावे:

 जर तुम्हाला पोटात कळ जाणवते ही समस्या अधिक प्रमाणात वाढत असेल आणि पोटामध्ये कळ येणे थांबत नसेल तर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यावे. उकळत्या पाण्यामध्ये दोन चमचे जिरे टाकावे. नंतर हे पाणी चांगले उकळून घ्यावे आणि हे पाणी दिवसातून दोन-तीन वेळा प्यावे.

असे केल्यामुळे तुमच्या पोटात निर्माण होणाऱ्या कळा थांबण्यास तुम्हाला मदत होईल.

 आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले पोटात कळ निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हे घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला घ्यायचा असेल तर कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

English Summary: pain stomach is very painful try this remedy and save from stomach pain Published on: 07 April 2022, 11:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters