1. आरोग्य सल्ला

टरबूज खा परंतु सांभाळून!नाहीतर टरबूज ओव्हर डोसचा होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम?

उन्हाळ्यामध्ये बहुतेक जण टरबूज खातात. असे मानले जाते की उन्हाळ्यामध्ये टरबूज खाणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते परंतु तुम्हालाजाणून आश्चर्य वाटेल की या फायदेशीर टरबूजा मुळे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
watermelon excess eating maybe harmful for health so take precaution

watermelon excess eating maybe harmful for health so take precaution

 उन्हाळ्यामध्ये बहुतेक जण टरबूज खातात. असे मानले जाते की उन्हाळ्यामध्ये टरबूज खाणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते परंतु तुम्हालाजाणून आश्चर्य वाटेल की या फायदेशीर टरबूजा मुळे  अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

या लेखामध्ये आपण टरबुजाचे काही फायदे परंतु टरबूज जास्त खाल्ल्याने शरीराला काय त्रास होऊ शकतो याबद्दल माहिती घेऊ.

 टरबूज खाणे फायदेशीर की हानिकारक?

टरबूज हे फळ उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाते. कारण अनेक अहवालांमध्ये टरबूज मध्ये 90 टक्के पाणी असल्याचे म्हटले आहे.उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि डीहायड्रेशन ची समस्या दूर होऊ शकते.टरबूज खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते हे नाकारता येणार नाही.

पण असं म्हणतात की कुठलीही गोष्ट जास्त करणे हीस्वतःला आणि शरीराला त्रासदायक असते.टरबूज खाण्याचे प्रमाण जास्त असले तर अनेक दुष्परिणामांना सामोरेजावे लागू शकते. आपण टरबूज जास्त प्रमाणात खाल्ले तर काय धोके संभवतात याची माहिती घेऊ.

नक्की वाचा:Business Idea: आपल्या गावातच सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा लाखों, वाचा

 जास्त प्रमाणात टरबूज खाण्याचे दुष्परिणाम

1- लठ्ठपणाची समस्या-टरबूज हे एक गोड फळ आहे हे सर्वांनाच माहीत आहे.पण टरबूजा मध्ये नैसर्गिक साखर असतेअसा अनेकांचा गैरसमज आहे त्यामुळे त्याच्या सेवनानेलठ्ठपणा वाढू शकत नाही.पण तज्ञांचे म्हणणे आहे की साखर कोणतीही असली तरी तिचे अतिसेवन नेहमीच वजन वाढण्याचे संकेत देते.

अशा परिस्थितीत तरबूज मध्ये नैसर्गिक साखर देखील असते, त्यामुळे त्याचे अतिसेवन तुम्हाला लठ्ठपणा कडे ढकलू शकते.  रात्री टरबूज खाण्याने हा त्रास जास्त होतो कारण रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावयाला लागते.

2- त्वचेची समस्या-टरबूज मध्ये लायकोपीन असते.एक अँटिऑक्सिडंट आणि रंगद्रव्य आहे जे लालसरपणा देण्याचे काम करते.एका अहवालानुसार,लायकोपिन हे जास्त सेवन केल्याने त्वचा रंगद्रव्य बदल होऊ शकतो.या प्रकरणात टरबूज जास्त प्रमाणात झाल्याने त्वचा पिवळी केशरी होते ज्याला लायकोपेनेमिया म्हणतात.

नक्की वाचा:महाराष्ट्र सरकारच्या 'या' योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 हजार रुपये, वाचा सविस्तर

3- रक्तातील उच्च साखरेची पातळी- टरबूज हे एक फळ आहे जे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले मानले जाते.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला मधुमेहाची समस्‍या असेल तर त्याचे अमर्याद सेवन रक्तातील साखरेची पातळीअधिक वेगाने वाढवू शकते. अशा परिस्थितीत ते जास्त खाणे टाळावे.

4- पचनाची समस्या- एका अभ्यासानुसार, टरबूज फळाचे जास्त सेवन केल्याने गॅस, डायरिया किंवा ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसे पाहायला गेले तर टरबूज मध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण देखील आढळते.फ्रुकटोज ही एक साधी साखर आहे ज्याचे जास्त सेवन केल्याने फुगणे किंवा सूज येऊ शकते.

 वाचा:Pm Kisan: पीएम किसानचे 2 हजार आले नाहीत का? अहो मग 'या' नंबरवर करा फोन

English Summary: watermelon excess eating maybe harmful for health so take precaution Published on: 02 June 2022, 09:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters