1. आरोग्य सल्ला

लाल जर्दाळू:हिमाचलमध्ये लागवड करण्यात आलेला लाल जर्दाळु कॅन्सरशी लढण्यासाठी आहे उपयुक्त

आपल्याला सगळ्यांना पिवळा जर्दाळू माहिती आहे.परंतु लोकांना आता पिवळ्या जरदाळू सोबत लाल जर्दाळू देखील चाखता येणार आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
red apricot is benificial in cancer prevention cultivate in himachal pradesh

red apricot is benificial in cancer prevention cultivate in himachal pradesh

आपल्याला सगळ्यांना पिवळा जर्दाळू माहिती आहे.परंतु लोकांना आता पिवळ्या जरदाळू सोबत लाल जर्दाळू देखील चाखता येणार आहे

हिमाचल राज्यातील शिमला जिल्ह्यातील कोटखाई येथील बखोल गावातील एका शेतकऱ्याने त्याच्या बागेत लाल रंगाची जर्दाळू लाल बोलेरो ही स्पॅनिश जात लावली आहे.त्याचा आकार सामान्य जर्दाळू पेक्षा मोठा आहे. तसेच त्याची ताजे शेल्फ लाईफ सामान्य जर्दाळू पेक्षा दहा दिवस जास्त आहे.

लाल जर्दाळू रेड बोलेरोची वृद्धत्व विरोधी गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करतो आणि अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये असणारे फेनोलिक ऍसिड कॅन्सरच्या पेशी वाढणे पासून रोखते.म्हणजे ही जात कॅन्सरशी लढण्यासाठी फायदेशीर आहे. लाल जर्दाळू मध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या व्यतिरिक्त अँटिऑक्सिडंट,विविध विटामिन, कॅरोटीन, विटामिन सी आणि ई मोठ्या प्रमाणात आढळते.

याबाबतीत बागातदार शेतकरी संजीव चव्हाण म्हणतात की, 2020 मध्ये त्यांनी इटली  मधून लाल बोलेरो आणि रुबेल जातीची जरदाळू ची रोपे आयात केली होती. त्याची लागवड केल्यानंतर साधारणतः दोन वर्षांनी फळे येण्यास सुरुवात झाली आहे.

रेड बोलेरो पूर्णपणे तयार होण्यासाठी आणखी दहा दिवस लागतील. त्याचा आकार इतर जरदाळू पेक्षा मोठा असून बाजारपेठेत त्याची मागणी अधिक असते. तसेच त्याची ताजेपणा चे आयुष्य जास्त असल्याने त्याची वाहतूक करणे सुलभ होईल. त्याची बाह्य साल गडद लालरंगाची असते.

जरदाळू पूर्णपणे सेंद्रिय आहे कारण त्यात स्प्रे नाही.हा जरदाळूसुकवून खाता येतो आणि त्याचे दाणे ही गोड असतात.

 महत्त्वाच्या बातम्या नक्की वाचा:SBI ची भन्नाट ऑफर! एसबीआयचे ATM बसवा अन दरमहा कमवा 60 हजार; जाणुन घ्या याविषयी

नक्की वाचा:स्वित्झर्लंड फुलकोबी: शेतकऱ्याने पिकवली स्वित्झर्लंडची पिवळी आणि जांभळी फुलकोबी, जाणून घेऊ तिचे फायदे

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कृषी विद्यापीठांना मिळणार कोट्यावधींचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा

English Summary: red apricot is benificial in cancer prevention cultivate in himachal pradesh Published on: 30 May 2022, 11:56 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters