सध्या जीवन शैलीमुळे (lifestyle) आणि रोजच्या आहारामुळे अनेकांना आरोग्याच्या (Health) अनेक समस्या उद्भवत असतात. आपल्या शरीरासोबत मनाचही आरोग्य उत्तम राहावे असे सर्वांनाच वाटत असते.
आपण जेव्हा आपल्या आरोग्याचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा आपल्या फक्त शारिरिक आरोग्य (physical health) डोळ्यासमोर येते आणि आपण फक्त याचाच विचार करतो. आरोग्यसाधना करायची म्हणजे व्यायाम करायचा आणि योग्य तो आहार घ्यायचा हा आपला विचार असतो.
हा विचार चुकीचा नाही परंतु हा परिपूर्णही नाही. भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र आणि आयुर्वेद आपल्याला आरोग्याचे ४ पैलू सांगतात. हे चारही पैलू विचारपूर्वक अभ्यासले तर आपल्याला आरोग्य परिपूर्ण कसे ही लक्षात येईल. आज आपण या 4 सुत्रांविषयी माहिती जाणून घेऊया.
घरबसल्या सुरू करा 'हा' लोकप्रिय व्यवसाय; दरमहा 2 लाख रुपयांची होईल कमाई
१) आहार
आहार म्हणजे आपण आपल्या शरीरात घन, द्रव, किंवा वायू रुपात येणारे सर्व घटक आहेत. आहारामध्ये जसा आपल्या रोजच्या अन्नाचा समावेश होतो, तसाच आपण आत घेणाऱ्या हवेचा सुद्धा समावेश होतो.
त्यामुळे दररोज सात्विक, चौरस आहार जसा महत्वाचा, त्याचप्रमाणे मोकळी हवादेखील महत्त्वाची असते. दररोज सकाळी शुद्ध हवा मिळण्यासाठी बाहेर जावं, गच्चीवर जावं, संध्याकाळी किंवा रात्री ओंकार मंत्राचा जप करावा.
२) विहार
विहार याचा अर्थ रिकाम्या वेळात आपण केलेली कृती. आपले काम, कर्तव्य (Duty) झाल्यावर उरलेला वेळ आपण नेमका कसा घालवतो. आपल्याला हा रिकामा वेळ असतो का, नसेल तर आपण तो काढण्याचा प्रयत्न करतो का, किंवा तो वेळ नाही याची जाणीव आपल्याला आहे का.
मनोरंजनासाठी आपण निवडलेल्या माध्यमांमधून किंवा कृतींमधून आपण मनाला शांत करतो का हे प्रश्न एकदा स्वतःलाच विचारून बघितले तर आरोग्याचा हा पैलू तुमच्यासमोर उलगडेल.
कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून इंजिनिअरींगचा तरुण शेतात कमवतोय लाखों रुपये
३) आचार
आचार याचा अर्थ आपली वागणूक. आपली वागणूक, तीन प्रकारची. एक म्हणजे, आपण स्वतःशी कसे वागतो. आपण आपले मित्र बनून वागतो की शत्रू बनून.
दुसरं म्हणजे आपण आपल्या प्रेमाच्या माणसांशी कसे वागतो. तिसरं म्हणजे, आपण समाजाशी कसे वागतो. समाजात वागताना आपल्याला हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव असते का. याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
४) विचार
विचार हा आरोग्याचा सर्वाधिक महत्वाचा आणि बराचसा दुर्लक्षित पैलू. आपल्या मनात सतत विचार येतात का. येत असतील तर ते नकारात्मक येतात का. आपल्या मनात जे विचार येतात, त्याची आपल्याला जाणीव असते का.
विशेष म्हणजे आपले आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण (Control of emotions) असतं की आपले विचार आणि भावना आपल्याला नियंत्रित करतात याचा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या
ज्वारी-बाजरी आणि इतर तृणधान्यांसाठी देशात 3 केंद्रे स्थापन; शेतकऱ्यांना होणार फायदा
LIC ची जीवन लाभ योजना सर्वोत्तम; 253 रुपयांच्या गुंतवणुकीवर 54 लाख रुपयांचा मिळतो लाभ
पुढील 7 दिवस सावधानता बाळगण्याची गरज; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य
Share your comments