1. आरोग्य सल्ला

अर्धांगवायूमध्ये( पक्षाघात) 'या' घरगुती उपाय केल्याने मिळतो बऱ्यापैकी आराम, जाणून घेऊ सविस्तर माहिती

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this is useful home remedy in paralysis so read this carefully

this is useful home remedy in paralysis so read this carefully

आपण कधीही आजारी पडू शकतो आणि काही आजारांवर सहज उपचार होऊ शकतात. परंतु असे काही आजार आहेत, की उपचाराने बराच वेळ घेऊनही माणूस बरा होत नाही.

मानवी शरीर हे नाशवंत आहे, एक ना एक दिवस नष्ट होतेच पण कोणत्याही रोगाशिवाय तो नष्ट होऊ शकत नाही, त्यासाठी कोणत्या ना कोणत्या रोगाचा आधार लागतो, मग तो छोटा असो वा मोठा.

अर्धांगवायू देखील यापैकी एक रोग आहे जो कधी कधी मानवी शरीराचा नाश करण्याची भूमिका बजावतो. आयुर्वेदात याला अर्धांग वायू रोग असे ही म्हणतात या आजारामुळे लोकांचे हात पाय वाकडे होतात आणि त्याच वेळी शरीराचे अनेक अवयव काम करणे बंद करतात.

अर्धांगवायू बाबत तज्ञांचे मत आहे की, त्याचा मेंदूच्या एका भागावर परिणाम होतो, त्यामुळे कधीकधी लोकांच्या शरीराची एक बाजू काम करणे थांबते तसेच हात-पाय वाकडे झाल्याचे तुम्ही पाहिले असेल.

नक्की वाचा:नक्की वाचा:जंगली बदाम आहे खूपच औषधी गुणधर्मयुक्त, जाणून घ्या जंगली बदामाच्या आरोग्यदायी फायदे

पक्षाघात बरा करण्यासाठी घरगुती उपाय:

1) लिंबूपाड एनिमा:-

 अर्धांगवायू बरा करण्यासाठी लेमोनेड एनिमा हा एक उत्तम उपचार आहे. त्याच्या कार्यपद्धतीनुसार पीडित रुग्णाने दररोज लिंबूपाणी चा एनिमा घेऊन पोट साफ  केले पाहिजे, जेणेकरून त्याच्या शरीरातून जास्तीत जास्त घाम बाहेर पडेल, कारण घाम हा रोग कमी करण्यास मदत करतो.

2) उडीद डाळ आणि सुंठ पाणी:-

 अर्धांगवायूचा घरगुती उपचार करण्यासाठी उडीद डाळ आणि सुंठ यांचे पाणी मंद आचेवर गरम करा. आणि हे मिश्रण रोज रुग्णाला द्यावे. त्यामुळे बराच आराम मिळतो.

नक्की वाचा:Diet Precaution: चपाती आणि भात एकत्र खात असाल तर सावधान, होऊ शकतात हे दुष्परिणाम

3) दूध आणि खजूर :-

 अर्धांगवायूचा रुग्णाला दररोज दुधात भिजवलेले खजूर द्यावे, कारण या दोन गोष्टींचे मिश्रण रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

4) ओल्या चिकन मातीचा लेप :-

 अर्धांगवायू बरा करण्यासाठी पक्षाघाताने पीडित रुग्णाच्या पोटावर ओल्या मातीची पेस्ट लावावी. जर हे रोज करणे शक्य नसेल तर हा उपाय एक दिवस सोडून जरुर करावा कारण त्यामुळे पक्षाघात बरा होण्याची शक्यता जास्त असते.

5) तुळस आणि दही मिश्रण :-

 अर्धांगवायूचा समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीची पाने दही आणि सेंधक मिसळून त्याची पेस्ट लावल्याने रुग्णाला आराम मिळतो

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

नक्की वाचा:या'5 अत्यावश्यक भारतीय मसाल्यांमध्ये आहे बरेच आजार चुटकीसरशी पळवण्याची ताकत

English Summary: this is useful home remedy in paralysis so read this carefully Published on: 21 June 2022, 09:01 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters