1. आरोग्य सल्ला

ही लक्षणं किडनी फेलची असू शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका

किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की, सुरुवातीच्या काळात आपण त्याकडे लक्ष देत नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ही लक्षणं किडनी फेलची असू शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका

ही लक्षणं किडनी फेलची असू शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका

किडनी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणेच किडनीही तंदुरुस्त आणि चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण किडनीमध्ये होणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, परंतु हे कधीही करू नये. कोविड झाल्यानंतरही लोकांना किडनीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्‍याचे काम आपली किडनी करते.किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की, सुरुवातीच्या काळात आपण त्याकडे लक्ष देत नाही किंवा असे म्हणा की, आपल्याला ते जाणवूही शकत नाही. म्हणूनच याला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. येथे आम्ही तुम्हाला किडनीची काही सामान्य लक्षणे सांगत आहोत.

पाय आणि घोट्याला सूज येणे आपल्या ओटीपोटात असलेले दोन बीन-आकाराचे अवयव शरीरातील खराब पदार्थ आणि अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपली किडनी नीट काम करणे बंद करते, तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीरात सोडियम तयार होऊ लागते. या कारणामुळे घोट्याला सूज येऊ लागते.

हे ही वाचा - पचन व्यवस्थित होण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

या स्थितीला एडेमा देखील म्हणतात. इतकेच नाही तर शरीराच्या इतर अनेक भागांमध्ये हळूहळू सूज येऊ लागते.थकवा किंवा अशक्तपणा जर तुम्हाला मूत्रपिंडाची समस्या असेल तर तुम्हाला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. किडनीची समस्या ज्या प्रकारे तीव्र होते, व्यक्तीला अधिकाधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटू लागते, त्याचा परिणाम असा होतो की, त्या व्यक्तीला चालणे कठीण होते.

भूक नसणे शरीरात खराब पदार्थ साचल्याने भूकही कमी होते, ज्यामुळे अचानक वजन कमी होते. म्हणूनच भूक कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पहाटे मळमळ आणि उलट्या होणे. जर किडनीची समस्या असेल तर त्या व्यक्तीला सतत पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि काहीही खावेसे वाटत नाही, जे तुमच्यासाठी धोकादायक देखील असू शकते.जास्त लघवीला होणे एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून 6-10 वेळा लघवी करते. जर तुम्ही यापेक्षा जास्त वेळा लघवी करत असाल तर तुम्हाला किडनीची समस्या आहे हे स्पष्ट होते. ज्या लोकांना किडनीचा त्रास होतो, ते वारंवार लघवीला जातात. काही लोकांच्या लघवीत रक्त किंवा जास्त प्रमाणात रक्त येते. असे म्हटले जाते की हे घडते कारण खराब झालेल्या किडनीमुळे रक्त पेशी लघवीतून बाहेर पडतात.

कोरडी त्वचा कोरडी त्वचा आणि खाज सुटणे हे किडनी विकाराचे लक्षण असू शकते. किडनीच्या समस्येमुळे हाडांचे आजारही होऊ शकतात.किडनीची समस्या ज्या प्रकारे तीव्र होते, व्यक्तीला अधिकाधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटू लागते, त्याचा परिणाम असा होतो की, त्या व्यक्तीला चालणे कठीण होते.त्यामुळे वरीलपैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा, किडनीवर उपचारही वेळेत शक्य आहे. उच्च रक्तदाब, शुगर आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेल्या व्यक्तींना किडनीचे विकार होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत या आजाराला कधीही हलक्यात घेऊ नये.

English Summary: These symptoms can be related to kidney failure, do not ignore it Published on: 23 May 2022, 01:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters