1. आरोग्य सल्ला

व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं बरं

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत अस तात व कालांतराने त्या ओसरतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं बरं

व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं बरं

त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात.पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती.प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले.कॅन्सर, डायबेटीस. बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार. कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !अल्कली WATER. ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार.२० हजार - ३० हजार मशीनची किंमत. मशीन्स धूळ खात पडली. लाट ओसरली!सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी.

वजन घटणार ,बांधा सुडौल होणार, हजारो लिटर मध संपले.हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले. लाट ओसरली, मग आली नोनी फळाची लाटनोनीने नानी आठवली पण तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली अलोव्हेरा ज्यूस. सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार. हजारो बाटल्या खपल्या. विशेष काही बदलले नाही! लाट ओसरली!मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.५०००करोड चा व्यवसाय झाला.परिस्थिती आहे तीच.ही लाट आता उसळ्या घेतेय. ओसरेल लवकरच !लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

डोकं वापरा आणि Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा आणखी थोडं डोकं लावा आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो लोकांना शिस्त नकोय, जीभ चटावलीय, पैसा बोलतोय."स्वयंपाक नकोय, आता तर घरपोच., पंधरा मिनीटातआली लाट मारा उड्या, सतत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!सकाळी लवकर उठणं,रात्री लवकर झोपणं, दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. 

आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?दिर्घायुष्य लाभावं,आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,या करीता आपला आहार,आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात. या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.आणि हो :-या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल.

 

M.D.Barshi.

English Summary: There is no substitute for exercise Published on: 31 May 2022, 11:52 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters