1. आरोग्य सल्ला

डेंग्यू तापाची लक्षणे आणि सोपे उपचार

डेंग्यूचा डास चावल्यानंतर तुम्हाला त्याची बाधा झाली असेल तर तुमच्यामध्ये या तापाची ठराविक लक्षणे दिसून येतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
डेंग्यू तापाची लक्षणे आणि सोपे उपचार

डेंग्यू तापाची लक्षणे आणि सोपे उपचार

ही लक्षणे कोणती ते देखील पाहुयाखूप ताप येणे, डोळे जळजळणे, अंग दुखी,कंटाळा येणे ,उलट्या होणे तापामध्ये खाल्लेले पचत नाही त्यामुळे उलट्या होतात.तुम्हाला सतत मळमळल्यासारखे आणि उलटी सारखे वाटते. काहींना उलट्यांमधून रक्तस्रावही होतो. जर तुम्हाला रक्तस्राव होऊ लागला म्हणजे तुम्हाला तुमची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.-त्वचेवर लाल चट्टे येणे डेंग्यूमधील हे आणखी एक लक्षण म्हणजे तुमच्या अंगावर लाल चट्टे उठू लागतात. शिवाय तुमच्या अंगावर लाल पुळ्या येऊ लागतात.जर तुम्हाला तापात तुमच्या अंगावर चट्टे येताना दिसत असतील तर तुम्हाला डेंग्यू असण्याची शक्यता आहे.

-डोकेदुखी ,भूक मरणे, पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते डेंग्यूमधील सर्वात मोठी भीती ही तुमच्या पांढऱ्या पेशी कमी होणे हे आहे. या तापामुळे तुमच्या रक्तातील पांढऱ्यापेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असते.अगदी लाखोंच्या संख्येने या प्लेटलेट्स कमी होत असतात. डेंग्यूची कारणे, डास चावल्यामुळेआता तुम्हाला डेंग्यू झाल्याचे पहिले कारण कळले असेल ते म्हणजे डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू होऊ शकतो. डेंग्यूचा डास हा विशेष असतो.तो चावल्यानंतर डेंग्यू होतो.संसर्गामुळे जर एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला असेल. अशा आजारी व्यक्तीला डेंग्यू चावला आणि तो दुसऱ्याला चावला तर त्यांच्या संसर्गामुळे डेंग्यू होण्याची शक्यता असते

साचवलेल्या पाण्यातून डासांची निर्मिती पावसाळ्यात खूप ठिकाणी पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. डासांमुळे डेंग्यूच नाही तर मलेरिया होण्याची देखील शक्यता असते.कशी घ्याल काळजी-मॉस्किटो क्रिम,तुळशीचे झाड लावा दारी बहुगुणी तुळस ही आवर्जून लावली जाते. तुळशीचे फायदे हे अनेक आहेत. अनेक आजारांवर तुळस ही गुणकारी आहे. शिवाय तुळस मनुष्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन उत्सर्जित करते म्हणूनच वैज्ञानिक दृष्टया देखील तुळस लावण्याचे अनेक फायदे आहेत. घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर घरात शुद्ध हवा खेळती राहण्यासाठी तुळशीचे रोप मदत करते. त्यामुळे तुम्ही घरी तुळशीचे झाड आवर्जून लावायला हवे.-कचऱ्याचे करा नियोजन कचऱ्याचे नियोजन करणे हे फार गरजेचे असते. पावसात अनेक ठिकाणी पाणी साचते. 

या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. ओल्या कचऱ्यावरदेखील डासांची उत्पत्ती असते. मुळात जिथे घाण असते. तिथेच डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तुम्ही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवे.-सुगंधी द्रव्ये नका वापरु नयेसुंगधी द्रव्यांचा या दिवसात वापर करु नका असे मानले जाते. कारण सुगंधी द्रव्याला डास अधिक आकर्षित होतात. त्यामुळेच सुंगधी द्रव्यांचा वापर करु नका असे सांगितले जाते.दार-खिडक्या करा बंद तुमच्या घरात येणारे डास हे डेंग्यूचेच आहेत की नाही हे तुम्हाला लगेचच कळू शकत नाही. पण जर तुमच्या आजूबाजूला डेंग्यूचे रुग्ण असतील तर अशावेळी तुम्ही खबरदारी घेणे जास्त गरजेचे असते. म्हणूनच घरी येणाऱ्या डासांना रोखण्यासाठी पहाटे आणि संध्याकाळच्यावेळी दार- खिडक्या बंद करायला विसरु नका. जर दार-खिडक्या बंद करणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना जाळ्या तरी लावा.

English Summary: Symptoms and easy treatment of dengue fever Published on: 28 May 2022, 03:26 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters