भारतात पारंपारिक आणि घरगुती औषधांसाठी विविध औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही वनस्पतींमध्ये असे दैवी गुणधर्म असतात. ज्यातून तुमचे गंभीर आजार सहजपणे बरे होतात. गुळवेल या वनस्पतीबद्दल आपण माहिती घेऊया.
गुळवेल ही एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. याचे अनेक प्रकारच्या आजारांवर वर्षानुवर्षे सेवन केले जात आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या काळात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल काढ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गुळवेलचे आयुर्वेदात चमत्कारिक औषध म्हणून वर्णन केले आहे. गुळवेल नियमित सेवन केल्याने अनेक प्रकारचे गंभीर आजार दूर होण्यास मदत होते. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी विशेष फायदेशीर आहेत.
हे ही वाचा: रेशन कार्डचा नवीन नियम आला; 'या' अपात्र शेतकऱ्यांना त्वरित करावं लागणार रेशनकार्ड सरेंडर
डेंग्यू-चिकुनगुनियामध्ये फायदेशीर गुळवेल -
पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अशावेळी सावध राहण्याची गरज असते. विशेषतः पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांमुळे होणारे आजार त्रासदायक ठरतात.
आयुर्वेद तज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुळवेलच्या नियमित सेवनातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते. या आजारांवर उपचार म्हणून गुळवेल हा प्रमुख घटकच उपयोगी औषध म्हणून वापरला जातो. तसेच कर्करोग (कॅन्सर) ची लागण होण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत खूपच कमी असतो.
हे ही वाचा: नितीन गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन; सरकारच्या ‘या’ योजनेतून वाढणार सर्वसामान्यांचे उत्पन्न
शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी करा फक्त 'हे' काम; लाखों रुपयांनी वाढणार उत्पन्न..
गुळवेल सेवन केल्याने कसलीही ॲलर्जी होत नाही. त्यामूळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी-खोकला, ताप असलेल्या 75 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, गुळवेल सेवनाने या समस्यांची लक्षणे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.
हे ही वाचा: कामठी सोसायटीच्या चेअरमन पदी गणेश आरडे यांची निवड
रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..
Share your comments