गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. प्रत्येकाने यामध्ये कोणालातरी जमवले आहे. यामध्ये कोरोना काहीसा नाहीसा झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागणार आहे. आता रविवारी राज्यात कोरोनाचे 550 रुग्ण आढळून आले, जी तीन महिन्यांतील सर्वाधिक दैनिक संख्या होती.
सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. काल राज्यात कोरोनाचे 550 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वकाही सुरळीत चालू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. सध्याचा आकडा हा तीन महिन्यांतील सर्वाधिक आहे. तसेच राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत कोरोनाचे 375 नवीन रुग्ण आढळले, ज्या दरम्यान कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 14% वाढ नोंदवली गेली. तसेच काल महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये रविवारी कोरोनाने एका व्यक्तीचा बळी घेतला. यामुळे अजूनही कोरोना गेला, असे समजनारांसाठी हा एक मोठा धोका ठरू शकतो. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी राज्यात सर्वाधिक 675 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली.
म्हैस फक्त त्यालाच दूध काढून देते!! मग काय कपाळावर बाशिंग आणि नवरदेव काढतोय म्हशीचं दूध
त्यानंतर 108 दिवसांनंतर मुंबईतील कोरोना रुग्णांची ही सर्वाधिक दैनिक संख्या आहे. यासह, मुंबईत कोरोनाचे सक्रिय रुग्ण 2 हजारांहून अधिक झाले आहेत, तर महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 997 वर पोहोचली आहे. यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊनचे दिवस आणायचे नसतील तर मास्त लावून काळजी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कृषिपंपावर लक्ष ठेवा!! एका रात्रीतून 10 कृषिपंप चोरीला
मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना; भांडवल खर्चात होणार वाढ
घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर
Share your comments