1. आरोग्य

लसनाचे होतात हे आरोग्यदायी फायदे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
helth benifit to garlic

helth benifit to garlic

 आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसून होय. आपण विविध प्रकारच्या भाज्या आणि पदार्थांमध्ये लसून वापरतो.  तसेच घरात मसाला बनवताना लसूण अग्रस्थानी असतो. या लेखात आपण या लसणाचे शरीरासाठी असलेले उपयुक्त फायदे जाणून घेणार आहोत.

  • सर्दी, खोकला, विश्वास अशा कप विकारात लसुन पिंपळी चूर्ण चा उपयोग करावा. हृदय रोग, दमा, कफाचा खोकला असे त्रास जाणवत असल्यास आहारात तुपात तळलेला लसणाचे सेवन करावे.
  • अतिसार, आव पडणे  यामुळे पोटात मुरडा आल्यासारखे होते. अशावेळी लसना पासून तयार केलेली लसूनादि वटी योग्य मात्रेत तुपात कालवून घेतल्यास मुरडा कमी होतो.
  • अन्न नीट पचत नसेल तर पोटात जडपणा जाणवतो. शिवाय अंग दुखणे, पचनशक्ती बिघाड, सांधे धरणे या तक्रारी असतात. त्यावेळी इतर औषधांच्या जोडीला लसुन जरूर वापरावा.
  • लसूण उत्तम जंतुनाशक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लहान मुलांच्या आहारातून लसणाचा वापर जरूर करावा.
  • श्वास विकार, फुफ्फुसाचे विकार, क्षय इत्यादी आजारांमध्ये लसुन तुपात लालसर तळून दिला जातो. त्यामुळे कफाची दुर्गंधी, कपातील दोष कमी होण्यास मदत होते तसेच इतर औषधांचा वापरही करावा.
  • गर्भवती स्त्रियांना लसुन अति प्रमाणात देऊ नये. त्यामुळे उष्णता वाढते व उष्णता वाढली तर धने उकडून द्यावेत.
  • लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजार बरे होतात.तळपायाच्या आजारांसाठी लसुन अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा ऍथलिट फूट यासारख्या आजारांवर लसूण गुणकारी आहे.
  • दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून  अ, ब आणि क जीवनसत्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्वे एकत्र मिसळतात. लसणाचे तेल तळहात आणि तळपायास लावल्यास डास जवळ येत नाही. तसेच त्वचाही  नितळ होते.

 

  • लसणामुळे उच्च रक्तदाब देखील कमी होतो. तसेच लसून मध्ये असलेले ऍलिसीन तत्व रक्तचापला कमी करतात. तसेच इतर दृश्याचे संबंधित आजार देखील कमी करतात. लसुन रुदयाला ऑक्सिजन रॅडिकल च्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फर युक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही.अँटी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाही. लसणात अँटीबॅक्टरियल गुण आहेत. म्हणूनच तारुण्यपिटिका ची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपिटिका वर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकर आराम मिळतो.

(टीप – कुठलाही औषधोपचार करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters