आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमाता पूजनीय आहे. आपल्याला माहित आहेच कि भारतीय गाईचे दूध असो या गोमूत्र याचे महत्त्व अबाधित आहे. परंतु भारतीय गाईंच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया या देशात जे काही मानसिक आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यावर उपचार केले जातात. यासाठी ऑस्ट्रेलिया या देशातील नॉर्थ क्वीन्सलँड मध्ये एक गाईंचे सानिध्य केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रामध्ये ऑस्ट्रेलियन नागरिक मनशांतीसाठी पोहोचत आहेत.
नक्की वाचा:Agri News: 'या' तारखेपासून सुरू होईल या वर्षीच्या ऊस गळीत हंगाम,वाचा माहिती
गायीसोबत वेळ घालवून मानसिक शांतता मिळवणे, त्यांना आलिंगन देणे व गायीची सेवा करणे. इत्यादी कार्य या सानिध्य केंद्रात केली जातात व विशेष म्हणजे यासाठी शुल्क आकारले जात आहे.
विशेष म्हणजे या वर्षापासून चार एनडीआयएक्स कंपन्या त्यांच्या नवीन योजनेमध्ये देखील उपचार पद्धती समाविष्ट करण्याचा विचार करत असून भारतीय प्रजातीच्या गाईंची त्यासाठी निवड करण्यात आली आहे कारण त्या शांत आहेत.जर आपण गाईंच्या विचार केला तर त्यांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते.
नक्की वाचा:Health Tips: 'हे' दोन घरगुती उपाय करा आणि पळवा पोटातील गॅस आणि पोटदुखी
अगोदर जे काही ऑटिझम स्पेक्ट्रमचे रुग्ण होते त्यांना उपचारासाठी घोड्यांचा तबेलात पाठवले जायचे व या थेरपीला इक्वीन थेरपी असे म्हणतात. परंतु आता ऑस्ट्रेलियामध्ये हॉर्स थेरपीला पर्याय म्हणून काऊ थेरपी खूप प्रसिद्ध होत आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर ब्रिस्बेन मध्ये राहणारा दहा वर्षे पॅट्रिक हा स्वमग्न रुग्ण आहे. तो या सानिध्य केंद्रात येऊन गायीशी खेळतो व त्याचे आईवडील त्याला नेहमी तिथे घेऊन येतात.
तसेच लॉरेन्स फॉक्स नावाचे ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणतात की,या ठिकाणी लोक बरे होतात व वेगवेगळ्या मानसिक आजार असलेले लोक इथे येतात. घोडे हे तसे आक्रमक असल्याने ते रुग्णांवर हल्ला करू शकतात परंतु गाईसोबत मात्र शांतता व आनंद मिळतो.
नक्की वाचा:Health Mantra! रात्री नका करू 'या' पदार्थांचे सेवन, तरच राहाल तरतरीत आणि निरोगी
Share your comments