1. आरोग्य सल्ला

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, लक्षणे व उपचार

हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, लक्षणे व उपचार

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, लक्षणे व उपचार

हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे.

कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक

वयाच्या 25 वर्षांनंतरच्या व्यक्ती,

लठ्ठपणा, डायबेटीसचे रुग्ण धमनीकाठिन्यता , हायब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये,

 हृदय विकारासंबंधी अनुवंशिकता असणे, कुटुंबातील आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास, आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो.

सिगारेट (धुम्रपान , तंबाखु, अमली पदार्थ इ. ) च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

हार्ट अटॅक खालील चार स्थितींमुळे येऊ शकतो.

धमनीकठिण्य किंवा अॕथोरोक्लेरोसिस - धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. यामध्ये हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्ट्रॉल व तत्सम पदार्थाचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात, 

त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृदयास होणाऱ्या रक्त आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृदयाचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.

रक्ताची गुठळी होणे

काहीवेळा हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये अचानक रक्ताची गुठळी तयार होते. त्या गुठळीच्या अडथळ्यामुळे हृदयास योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही परिणामी हार्ट अटॅक येतो. अशा प्रकारे झटका येण्याचे प्रमाण तरुण वयामध्ये जास्त आहे.  

काहीवेळेस रक्तातील गुठळी रक्तप्रवाहाबरोबर हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊनही अडथळा निर्माण करते.हृदयास रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अचानक आकुंचन पावल्यामुळेही हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो.

हार्ट अटॅकला सहाय्यक ठरणारी अन्य कारणे

कुटुंबामध्ये हृदय विकारासंबंधी अनुवंशिकता असणे . मधुमेह, धमनीकाठिण्यता, उच्च रक्तदाब असे आजार असणे,

रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असणे,

बैठी जीवनशैली,व्ययामाचा व शारीरिक श्रमाचा अभाव,चरबीयुक्त पदार्थ, तेलकट ,खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, केक, मिठाई असा चुकीचा आहार वारंवार खाण्यामुळे,जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, तंतूमय पदर्थ, फळे कमी खाण्याची सवय,तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल यासारखी व्यसने करणे, ही सर्व करणे हार्ट अटॅक येण्यासाठी जबाबदार ठरतात.

हार्ट अटॅकची लक्षणे-

अचानक छातीत वेदना सुरू होणे हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. छातीत होणाऱ्या त्या वेदनांना Angina असे म्हणतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वीची संकेत व लक्षणे खालील खालीलप्रमाणे असतात.

छातीत दडपल्यासारखे वाटते,

छातीत दुखायला लागते,

 छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.

 बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,

अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.

अशक्तपणा जाणवणे,

उलटी किंवा मळमळ होणे,

चक्कर येणे,

दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,

श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

हार्ट अटॅक आल्यावर काय करावे -  

धावपळ व जास्त हालचाल करू नका.आपल्या मदतीसाठी कोणाला तरी बोलावून घ्यावे.जर पेशंट बेशुद्ध असल्यास तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी आणि रुग्णावर सीपीआर उपाय करावेत. यामध्ये पेशंटला दुसरी एखादी व्यक्ती आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास देते व बाहेरून हृदयाला छातीवर दाब दिला जातो. रुग्णवाहिका येइपर्यंत हे उपाय करत राहावेत. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते.

हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी हे उपाय

 निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हार्ट अटॅकपासून बचाव करणे शक्य आहे. यासाठी आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी खालील हेल्दी टिप्सचे पालन करावे.

धूम्रपान, मद्यपान करू नका.

संतुलित व आरोग्यदायी आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, कडधान्ये, सुखामेवा यांचा आवर्जून समावेश करा.

 चरबी व कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खाणे टाळा.

दररोज व्यायाम करा.

सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जावे.

पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.

वजन आटोक्यात ठेवा.

मधुमेह असल्यास ब्लडशुगर नियंत्रणात ठेवा, हाय ब्लडप्रेशर असल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

 

( संकलन:आर्या देव )

English Summary: Heart attack come health reasons symptoms and control Published on: 26 March 2022, 05:07 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters