आपल्या देशात गुळवेल चा उपयोग बऱ्याच आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. जेव्हापासून राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव झाला आहे तेव्हापासून गुळवेलला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.रोग प्रतिकारशक्ती सुदृढ करण्यासाठी वापरली जाणारी एक सुप्रसिद्ध इमुनो मोड्युलटर औषधी वनस्पती म्हणून गुळवेल कडे बघितले जाते. या लेखात आपण गुळवेलचा आरोग्यदायी फायदे यांविषयी जाणून घ्यावी.
गुळवेल चे काही आरोग्यदायी फायदे
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढते: गुळवेल ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. जी रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी मदत करते. त्याला एंटीऑक्सीडेंट चे एक पावर हाउस देखील म्हटले जाते. गुळवेल फ्री रॅडिकल शी लढा देते व आपल्या शरीरातील पेशी निरोगी ठेवते. त्यामुळे रोगांपासून लांब राहता येते
-
गुळवेल शरीरातील टॉक्सिन बाहेर काढून टाकण्यास, रक्ताला शुद्ध करण्यास, रोगास कारणीभूत असलेल्या घातक बॅक्टेरिया यांची लढा देण्यास मदत करते तसेच यकृत रोग आणि युरिनरी ट्रॅक्ट संसर्गावर देखील प्रतिकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते.
-
पचन क्षमता सुधारते: पचन क्षमता सुधारण्यास आणि आतड्यांची संबंधित समस्या वर उपचार करण्यासाठी गुळवेल खूप फायदेशीर मानली जाते. ही औषधी वनस्पती डी टॉक्सिक फाईन एजंट म्हणून देखील काम करते.
-
गुळवेल पचन क्रिया बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. मजबूत पचन प्रणाली बनवण्यास मदत करते. तसेच यकृतावर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. बद्धकोष्टता समस्येवर देखील गुळवेल गुणकारी मानले जाते.
जमिनीचा NA म्हणजे नक्की काय? NA कसा करतात; जाणून घ्या...
-
वारंवार येणाऱ्या तापापासून मुक्तता करते: वारंवार येणाऱ्या आता पासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील गुळवेलचा वापर केला जातो. गुळवेल मध्ये खास अँटी पायरटिक प्रॉपर्टीज असल्याकारणाने डेंग्यू, स्वाईन फ्लू अशा जीवघेण्या आजारांना दूर ठेवते.
-
यासाठी गुळवेलची मूळ आणि त्यांच्या पानाचा वापर करू शकता. यामध्ये अँटी पायरेटिक आणि अँटी मलेरियल हे घटक असल्याने दीर्घकालीन तापाच्या समस्येतून मुक्त करण्यात मदत करू शकते.
-
वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते:गुळवेल मध्ये अनेक गुणधर्म घटक आहेत. त्यामध्ये असलेल्या अँटी एजिंग नावाचं प्रभाव घटक देखील उपस्थित आहे.
-
त्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच सुरकुत्या पडणे, डार्क सर्कल स्पॉट्स अशा अनेक त्वचा संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. अँटी एजिंग गुणधर्मांमुळे गुळवेल चे नियमित सेवन केल्यामुळे त्वचेला तेजस्वीपणा प्राप्त होतो.
-
नजर सुधारते: डोळ्यांशी संबंधित अनेक विकारांपासून मुक्त होण्यासाठी आपण गुळवेल चा वापर करू शकतो. तज्ञांच्या मते गुळवेल मध्ये सापडलेल्या इम्युनो मोड्युलटरी गुणधर्म डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. कारण ते दृष्टी स्पष्टतेस वाढीसाठी चालना देण्यास मदत करतात.
-
दम्याचा त्रास कमी करते: दम्यात आराम मिळण्यासाठी गुळवेल चे फायदे ही मोठ्या प्रमाणात उपयोगात आणू शकतात. दम्यामुळे धाप लागणे, खोकला येणे, श्वास घेण्यास अडचण येणे, घरघर आवाज येणे त्याची लक्षणे कमी करण्याची क्षमता गुळवेल मध्ये आहे.
-
डायबिटीस नियंत्रणासाठी उपयुक्त: गुळवेल हे मधुमेह टाळण्यासाठी देखील वापरतात. कारण त्यात अँटी हायपरग्लिसेमिक घटक रक्तातील साखर कमी करण्यास प्रभावी काम करते. तसेच शरीरातील इन्शुलिनची सक्रियता वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
- 7th pay commission ! सरकारच्या 'या' निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा
-
मानसिक ताण आणि चिंता कमी करते: गुळवेल मध्ये अडपटॉजेनिक औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. एडोपटोजेन हा एक असा घटक आहे जो आपल्या मानसिक ताण तणावातून मुक्त करण्यास मदत करतो.
-
त्याचबरोबर आपल्या शरीरातील विषारी घटकांपासून मुक्त होण्यास आणि आपल्या स्मरण शक्तीला चालना देण्यास देखील मदत करते.
टीप – कुठल्याही प्रकारचे उपचार करण्या अगोदर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
Share your comments