सध्या एक सर्रासपणे ट्रेंड दिसतो की जरा अंग दुखी, ताप वगैरे इतर गोष्टी जाणवायला लागल्या की लोक पेन किलर घेतात. या पेन किलर घेतल्यामुळे संबंधित दुखण्यावर फरक पडतो. परंतु पेन किलर घेतल्याने होणारे फायदे जसे आहेत तसे त्याचे दुष्परिणाम देखील आहेत, तेदेखील माहित असणे गरजेचे आहे.
कारण कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात केली तर त्याचे दुष्परिणामच पाहायला मिळतात हे जळजळीत सत्य आहे. आता या पेन किलर मध्ये पॅरासिटामोल हे औषध लोक खूप प्रमाणात वापर करतात. विशेष म्हणजे हे औषध घेताना कुठल्याही प्रकारचा डॉक्टरांचा सल्ला देखील घेतला जातनाही . तसे पाहायला गेले तर हे औषध ताप, अंगदुखी इत्यादींवर फायदेशीर आहेस पण जर याचा जास्त डोस चुकून घेतला गेला तर त्याचे लिव्हर आणि किडनी या महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम देखील होतो.
पॅरासिटॅमॉल ची सुरक्षितता
अंग दुखणे आणि ताप यावर जास्तीत जास्त प्रमाणात पॅरासिटामोल हे औषध घेतले जाते. तसे ते खूप लोकप्रिय आहे. परंतु त्याच्या घेतल्या जाणाऱ्या डोस बाबत माहिती असणे देखील गरजेचे आहे. जर तज्ञांच्या म्हणण्याचा विचार केला तर वयस्क यांनी 500 एमजी पेरासिटामोल ची एक किंवा दोन गोळ्या दिवसातून चार वेळा दिले जाऊ शकते. परंतु यापेक्षा जास्त डोस घेतला तर शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.
याबाबतीत इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्विस चे म्हणणे आहे की, वर उल्लेख केलेल्या डोस पेक्षा जास्त पॅरासिटामॉल जे सेवन केले तर मूत्रपिंड आणि यकृत खराब होऊ शकते. याबाबतचे एक रिसर्च सायंटिफिक रिपोर्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले त्या रीसर्च मध्ये मानवाच्या आणि उंदराच्या लिव्हरच्या कोशिकावर पॅरासिटामॉल च्या प्रभावाचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा या अभ्यासातून दिसून आले की,वेदना करणाऱ्या या औषधांचा विपरीत परिणाम लिव्हरवर पडू शकतो.
कारण यामुळे यामध्ये असलेल्या कोशिकांमध्ये संरचनात्मक जे कनेक्शन असते त्याला नुकसान होते. याचा परिणाम असा होतो की लिव्हरची उत्तक संरचना क्षतिग्रस्त होते. कोशिका योग्यप्रकारे काम करण्याची क्षमता गमावतात व व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. पॅरासिटामॉल चा डोस जास्त प्रमाणात घेतल्याने होणारे नुकसान हेपेटायटिस व कॅन्सरसारख्या दुर्धर रुग्णांचे नुकसानी सारखे असते. परंतु योग्य प्रमाणात याचा डोस घेतला तर होणारे दुष्परिणाम होत नाहीत असे तज्ञ सांगतात.(स्रोत-लोकमत)
पॅरासिटामॉल चा डोस व वापर(Use Of Parasitamol)
1- हे औषध घेण्याआधी मॅन्युफॅक्चर ची सूचना जरूर वाचावी. या सुचने मध्ये पेरासिटामोल कसे घ्यावे व त्याचे साईड इफेक्ट या बद्दल माहिती देण्यात आलेली असते.
2-डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणेच पेरासिटामोल औषध घ्यावे त्यापेक्षा जास्त घेऊ नये.
3- पॅरासिटामॉल औषधे जेवणानंतरच घ्यावे.
4- स्तनपान आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये.
5- जर तुम्हाला लिव्हरची समस्या आणि नियमित मध्यपान करण्याची सवय असेल तर हे औषध घेणे टाळावे.
पॅरासिटामॉल चे साईड इफेक्ट(Sideeffect to Paracetamol)
1- यकृतावर विपरीत परिणाम संभवतो.
2- त्वचेवर विपरीत प्रतिक्रिया व ऍलर्जी यासारख्या लक्षणे
3- प्लेटलेट्स कमी होतात
4- पोटात रक्तस्राव होऊ शकतो.
5- पांढऱ्या पेशी कमी होतात.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केले आहे. या माहितीचे व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाही. कुठलाही उपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Drip Irrigation Subsidy: शेतात बसवा ठिबक अन पाण्याची करा बचत, मिळवा 80 टक्के अनुदान
Share your comments