1. आरोग्य सल्ला

जाणून घ्या आवळ्याचे औषधी उपयोग

आवळा आकाराने जरी लहान असला तरीही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा समावेश असतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या आवळ्याचे औषधी उपयोग

जाणून घ्या आवळ्याचे औषधी उपयोग

कोणत्याही हंगामामध्ये याचे सेवन केले जाऊ शकते. दरम्यान कच्चे आवळे केवळ हिवाळ्यातच मिळतात. पण आवळ्याचा रस, कँडी, चूर्ण आणि मोरावळा इत्यादी स्वरुपातील आवळा बाजारात सहजरित्या उपलब्ध असतो. यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही वर्षभर आवळ्याचे सेवन करू शकता. आवळ्यापासून तयार केलेले कित्येक पौष्टिक पदार्थ आयुर्वेदिक दुकानांमध्येही मिळतात. शरीरातील वाढती चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठीही आवळ्यातील पोषक घटकांची मदत होते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. याव्यतिरिक्त आवळ्याचे अन्य आरोग्यदायी लाभ देखील आहेत.

व्हिटॅमिन सी आणि लोह आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. हे घटक आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करतात. सोबतच शरीराचा मेटाबॉलिक रेट संतुलित ठेवण्यासही मदत करतात. परिणामी शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही.आवळा हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. यासाठी भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केला जातो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधीमध्ये आवळा हे प्रमुख औषधी द्रव्य आहे.

आवळयामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह यांचे प्रमाण भरपूर आहे. आवळयात असणारे महत्वाचे कार्यकारी घटक जसे की, टॅनिन्स, फ्लेवोनाईडस्‌ सॅपोनिन असे पोषक घटक हे शरीरात विविध कार्य करतात. तसेच शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आवश्यक असते. यासाठी आवळ्यातील औषधी गुणधर्म उपयुक्त ठरतात.

बध्दकोष्ठता असणाऱ्यामध्ये आवळा चुर्ण किंवा कच्चा आवळा पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतो. आवळयात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पोट साफ करायला मदत करते. तसेच पंचरसांनीयुक्‍त आवळा हा पचनसंस्थेतील आमाचा निचरा करून त्याची कार्यक्षमता वाढवतो.मासिक पाळीचा महिला आरोग्याशी अत्यंत निकटचा संबंध असतो. मासिक पाळीचे काम केवळ प्रजोप्तादनच नाही तर विषारी घटक बाहेर टाकणे हेही असते. मासिक पाळी दरम्यान आवळ्यासह मंजिष्ठा, कडुनिंब व हळद यांचे चाटण स्वरूपात केल्यास अत्यंत लाभदायी ठरते.

English Summary: Learn about the medicinal uses of amla Published on: 17 May 2022, 12:49 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters