1. आरोग्य सल्ला

थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित

थायरॉईड ची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित

थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित

जर आपल वजन काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढत किंवा कमी होत असेल,चीडचीड वाढली असेल, उत्साह वाटत नसेल,शरीरावर सूज येत असेल तर ही सर्व लक्षणे थायरॉईड डीसऑर्डरची असू शकतात. थायरॉईड एक असा आजार आहे ज्यामुळे रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होऊ शकतो.यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचाराचा विशिष्ट कोर्स पूर्ण करायला हवा. हा आजार आपल्या हाडांवर ही परिणाम करतो म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने विटामिन सप्लीमेंट आणि कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं असतं.1) थायरॉईड रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आहारात कमी तळलेले पदार्थ सेवन करा. थायरॉईड रुग्णांना अन्न पचविणे थोडे कठीण जाते त्यामुळे त्यांनी जेवण केल्यानंतर थोडे चालणे आवश्यक आहे.2) डॉक्टर्स थायरॉइडच्या रुग्णांना दररोज काही वेळ उन्हात बसण्याचा सल्ला देतात व आयोडीन, हिरव्या पालेभाज्या, लसूण, तिळ, मशरूम खाणे हे रुग्णासाठी फायदेशीर ठरते.3) बरेच लोक थायरॉईडच्या औषधांबरोबर वजन कमी करण्यासाठीही औषधे घेतात. परंतु असे केल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.4)थायरॉईड रुग्णांसाठी सकाळ-संध्याकाळ चालणे खूप महत्त्वाचे आहे. थायरॉईड ग्रंथी योग्यरीत्या कार्य करत नसल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते यामुळे ती परत मिळवण्यासाठी मदत होईल तसेच वजन नियंत्रित राहील.

5) आपण थायरॉईडमध्ये ग्रीन टी पिल्याने आपले वजन वेगाने कमी होण्यास सुरुवात होते यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या.थायरॉईड ची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते.जर आपल वजन काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढत किंवा कमी होत असेल,चीडचीड वाढली असेल,उत्साह वाटत नसेल,शरीरावर सूज येत असेल तर ही सर्व लक्षणे थायरॉईड डीसऑर्डरची असू शकतात.थायरॉईड एक असा आजार आहे ज्यामुळे रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होऊ शकतो. यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचाराचा विशिष्ट कोर्स पूर्ण करायला हवा.

6) आपण चालण्याव्यतिरिक्त योग देखील करू शकता योग केल्याने केवळ वजन नियंत्रित राहणार नाही तर थायरॉईड समस्याच वाढण्यापासूनही प्रतिबंधित करेल.थायरॉईडची समस्या असणाऱ्यांसाठी उज्जयी प्राणायम सर्वात महत्वाचे.हा आजार आपल्या हाडांवर ही परिणाम करतो म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने विटामिन सप्लीमेंट आणि कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं असतं.थायरॉईड रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.आहारात कमी तळलेले पदार्थ सेवन करा. थायरॉईड रुग्णांना अन्न पचविणे थोडे कठीण जाते त्यामुळे त्यांनी जेवण केल्यानंतर थोडे चालणे आवश्यक आहे.

English Summary: Control the weight gain due to thyroid Published on: 28 May 2022, 09:03 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters