तुळशीला आणि तुळशीच्या बियांना (Basil seeds) आपल्या देशात जास्त महत्व आहे. विशेष म्हणजे तुळशीचा उपयोग आरोग्या संबंधित अनेक आजारांपासून बचाव करतात. त्यामुळे वापर कसा केला पाहिजे? याविषयी जाणून घेऊया.
महत्वाचे म्हणजे तुळशीच्या पानांपेक्षा त्याच्या बियांचा फायदा चांगला होतो. याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे तुळसीच्या बिया वजन नियंत्रित (Controlled seed weight) राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. या बियांचे सेवन केल्याने तुमचे वजन प्रभावीपणे कमी होऊ शकते. वजन कमी करण्यावर जालीम उपाय आहे.
या आजारांपासून करतात बचाव
1) कडक उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तुळशीच्या बिया उपयुक्त आहेत. एवढेच नाही तर विषाणूजन्य, सर्दी आणि तापासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
2) तुळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे पचनाच्या समस्या आणि पोट फुगण्यापासून आराम मिळतो.
3) तुळशीच्या बियांमध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म (Antispasmodic properties) असतात जे कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यास आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.
महात्मा गांधींची आज 153 वी जयंती; गांधीवादातून 'हे' पाच धडे तुम्ही घेतले पाहिजेत...
4) तुळशीच्या बियांमध्ये असलेले डाएटरी फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
5) तुळशीच्या बिया शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतात.
6) तुळशीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स (Antioxidants and flavonoids) भरपूर असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज उपलब्ध
पीक काढणीसाठी सर्वात स्वस्त मशीन लॉन्च; शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार
दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर
Share your comments