1. कृषी व्यवसाय

शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज उपलब्ध

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला पाहिजे तसा योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात घेऊन जातात. बाजारात शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होते.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Loan Scheme

Loan Scheme

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला (Agricultural goods) पाहिजे तसा योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात घेऊन जातात. बाजारात शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होते.

मात्र हाच शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी नेला तर चांगला बाजारभाव मिळू शकतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा म्हणून कृषि पणन मंडळ सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

शेतमालाच्या काढणीनंतर बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (Maharashtra State Board of Agriculture Marketing) राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे. कर्ज कसे दिले जाते आणि योजनेचे स्वरूप कसे आहे? याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.

दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर

योजनेचे स्वरूप

1) शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामा तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत 6 टक्के व्याजदरांना सहा महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध होते.

2) बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांचे शेतमालासाठी गोदाम भाडे विमा देखरेख खर्च अधिक खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना (farmers) भुरदंड बसत नाही.

4) सहा महिन्याच्या आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते

५) स्वनिधीतून तारण कर्ज राबवणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर तीन टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात मिळते.

पीक काढणीसाठी सर्वात स्वस्त मशीन लॉन्च; शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार

कुठे कराल संपर्क

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या 
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत
शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो

English Summary: Agricultural Mortgage Loan Scheme Beneficial Farmers Published on: 02 October 2022, 12:43 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters