1. आरोग्य सल्ला

चिरतरुण राहण्यासाठी आवळ्याचा आहार आवश्यक

आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
आवळ्याचे आरोग्यदायी फायदे

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे

आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे आणि तो कधी खाणं योग्य ठरेल हे जाणून घेऊ.

●डोकं शांत राहणं किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळ्याचं तेल इतर औषधींसह नियमित वापरल्यास फरक पडतो.

●ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.

●लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.

●आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.

आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते.

हेही वाचा : कोरोना काळात पुदीना चटणी खा, उन्हाळ्यात तुम्हाला फार आराम मिळेल

●नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.

●आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

●नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा

◆तर खाऊ नये आवळा
●अनेकदा आपल्याला फळं फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते, यामुळे फळं दीर्घकाळ टिकतात. पण हे खरं असलं तरी काही फळं मात्र फ्रिजमध्ये न ठेवलेलीच बरी म्हणून आवळे फ्रिजमध्ये ठेवू नये. त्यातून सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंड आवळे सेव करू नयेत.

आवळा थोडासा पिकलेला असावा. कच्चे आवळे खाऊ नयेत.
*या माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वैयक्तिक आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!!*

संकलन: नितीन जाधव
स्रोत:- निसर्ग उपचार
९१९०८२५५६६९४

English Summary: Amla diet is essential to stay young forever Published on: 15 May 2021, 08:43 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters