1. आरोग्य सल्ला

कोरफड औषधी वनस्पती : दूर करते दमा, खोकला अन् अपचनसारखे विकार

आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे मुळ उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे ही बहुवार्षिक वनस्पती आहे. कोरफडमध्ये अनेक औषधीगुण आहेत. इतकेच काय आयुर्वेद, चिनी हर्बल मेडिसीन आणि ब्रिटिश हर्बल मेडिसीन यांनी कोरफडीच्या औषधीगुणांची वकिली केली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Aloe vera medicine plant

Aloe vera medicine plant

आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे मुळ उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे ही बहुवार्षिक वनस्पती आहे. कोरफडमध्ये अनेक औषधीगुण आहेत. इतकेच काय आयुर्वेद, चिनी हर्बल मेडिसीन आणि ब्रिटिश हर्बल मेडिसीन यांनी कोरफडीच्या औषधीगुणांची वकिली केली आहे. या वनस्पतीची पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या स्वरूपात साचलेले असते. पाने लांबट असतात खोडाभोवती गोलाकार वाढतात.पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. असून   रुंदी ५ ते ७ सेंटिमीटर असते पानाच्या कडांना काटे असतात झाडाच्या मध्यभागातून एक लालसर उभा दांडा दिसतो व त्यावर केशरी रंगाचे फुले येतात.  जेव्हा आपण याव्यतिरीक्त याच्या औषधी गुणाविषयी बोलतो तेव्हा या वनस्पतीच्या आणखी एका भागाविषयी आपण माहिती घेतली पाहिजे. तो भाग म्हणजे सॅप हा पिवळ्या रंगाचा द्रव असतो. हे आतल्या बाजूला रोपाच्या त्वचेला चिटकलेले असते. जर आपला चेहारा कोरडा पडला असेल तर त्यासाठी हा द्रव लावला जातो. दरम्यान या वनस्पतीच्या लागवडीविषयी जाणून घेऊ याची लागवड करताना याला कोणत्या प्रकारची जमीन आणि हवामान आवश्यक असते ते पाहू.

जमीन हवामान:-

कोरफडीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते.कोरफडीला उष्ण व कोरडे हवामान लागते, कमी पाण्यावर वाढणारी ही वनस्पती असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात याची लागवड करता येते.

लागवड:-

जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी . काडी कचऱ्याच्या वेचणीनंतर प्रति हेक्टरी दहा टन शेणखत मिसळावे त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते नंतर जमीन ट्रॅक्टर किंवा वखराच्या साह्याने सपाट करून सरी-वरंबे पाडावेत कोरफडीची लागवड फुटव्यापासून केली जाते लागवड करताना दोन ओळींत ६० सेंटिमीटर व दोन झाडामध्ये झाडांमधील अंतर २५ सेंटिमीटर अंतर ठेवावे लागवड जुलै महिन्यात करावी पाण्याची उपलब्धता असल्यास लागवड केव्हाही करू शकतो. 

ओलीत खालील जमीन:-

पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरफडी पाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु उन्हाळ्यात प्रति पंधरा दिवसानंतर पाण्याची आवश्यकता असते.

हेही वाचा:रात्री झोपण्याआधी गूळ खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ फायदे; वाचा काय आहेत फायदे

अंतर्गत मशागत:-

वेळोवेळी निदन करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे वाफे तनरहित राहतील व बुंध्याजवळ माती भुसभुशीत ठेवल्यास झाडाची वाढ चांगली होते.

रोग-किडी:-

या पिकाच्या झाडावर विशेष किडी व रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही.पानावरील काळे ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी ०.२५ टक्के डायथेन M45 व ०.१० टक्के याचे मिश्रण ३ ते ४ वेळा १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

काढणी:-

पानाचे टोक किंवा पानाचा रंग पिवळसर झाल्यावर साधारणता कोरफड १४ ते १६ महिण्याची झाल्यावर औषधे उत्पादनासाठी काढावी पाने काढताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घेणे काढणीपूर्वी झाडाना पाणी दिले तर पानातील पाण्याचे प्रमाण वाढेल.

उत्पादन:-पिकाची चांगली काळजी घेतल्यास हेक्टरी १५ ते २० टन ओली पाणे मिळतात.

औषधी गुणधर्म:-

१)कोरफडीचें अँलोईल ( २० ते २२ टक्के) बार्बोलीन (४ ते ५ टक्के) तसेच शर्करा डिझाईन व इतर औषधी रसायने असतात.

२)कोरफड ही शीतल कडू मधुर पुष्टीकर बनकर विशेष गुणधर्म आहेत.

३) कोरफडीच्या रसायनापासून कुमारी आसव बनवितात हे शारीरिक अशक्तपणा खोकला दमा यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे.

४)कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांसाठी फार उपयुक्त आहे यात तेलाचा उपयोग केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी व केस काळे व चकाकी आणण्यासाठी करतात.

५) त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावावा.

६) कोरफडीचा गर पोटदुखी अपचन पित्त विकार यावर सुद्धा उपयोगी आहे.

७) डोळ्याच्या विकारावर कोरफड उपयोगी आहे.

८) भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी आहे.

९) सौंदर्यवृद्धीसाठी कोरफडीचा गचा उपयोग करतात.

१०)कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते.कोरफडीच्या पानात एलोईन व बार्बोलीन हे मुख्य ग्लुकोसाइन असतात.

लेखक

निलेश .बोरे

 एम.एस.सी. (कृषी विस्तार शिक्षण)

8830732414

सुशील पं. दळवी

सहा. प्रा. विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बु.

किशोर . कव्हर

सहा प्रा. कृषी महाविद्यालय डोंगरखंडाळा

English Summary: Aloe vera medicine plant : remove the asthma, cough, and dyspepsia disorder Published on: 24 June 2020, 05:37 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters