राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या योजनाचालवल्या जातात.या योजनांच्या माध्यमातून जनतेच्या काही समस्या असतात त्या सुटाव्यात व त्यामध्ये सुलभता यावी हा त्यामागचा उद्देश असतो.
जर आपण विजेसंबंधी विचार केला तर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकरण राज्यांमध्ये खूप गाजले होते. शेतकरी संघटनांनी याला विरोध केला होता. या बाबतीत देखील महावितरणकडून आकर्षक योजना राबवली गेली होती.
याच पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे अशा वीज ग्राहकांसाठी महावितरणने एक आकर्षक योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून ज्या ग्राहकांची वीज थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा जोडून देण्यात येणार आहे. अशा या फायदेशीर योजनेचे नाव आहे विलासराव देशमुख अभय योजना होय.
विलासराव देशमुख अभय योजना नेमकी काय आहे?
योजना एक मार्च 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा 31 डिसेंबर 2021 पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. व्याज व विलंब आकाराची 100% माफि या योजनेत देण्यात आली असून फक्त मूळ थकबाकी चे रक्कम भरून ग्राहकांना थकबाकी मुक्त होता येणार आहे.
तसेच मुद्दलाची रक्कम एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के आणि लघुदाब ग्राहकाच्या टक्क्याची अतिरिक्त सूट देखील देण्यात येणार आहे. तसेच मुद्दलाची रक्कम 30 टक्के भरून उर्वरित रक्कम सहा समान हप्त्यात भरण्याची देखील सवलत देण्यात आली आहे. परंतु ज्या ग्राहकांचा न्यायालयात वाद चालू आहे अशा ग्राहकांना या योजनेत भाग घेता येणार नाही.
ज्या ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवायचा असेल अशा वीज ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments