बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठीवेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा समावेश यामध्ये आहे
काही योजनांमध्ये बिनव्याजी कर्ज दिले जाते तर काही योजनांमध्ये अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. खरे पाहायला गेले तर बेरोजगारीचा प्रश्न हा अखंड भारतासमोरील सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने बेरोजगारांचे लोंढे डिग्र्या घेऊन बाहेर पडतात. परंतु त्यामानाने नोकऱ्यांचीउपलब्धता फारच कमी आहे.त्या अनुषंगाने तरुणांनी व्यवसायामध्ये उतरून स्वतःची आर्थिक उन्नती करणे हे महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका फायदेशीर योजने बद्दल जाणून घेणार आहोत जीबेरोजगारांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी मदत करते.
ही आहे उपयुक्त योजना(Benificial Scheme)
14 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेऊन वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमातीअर्थात व्हीजेएनटी महामंडळाच्या अंतर्गत दिले जाणारे पंचवीस हजार रुपयांची कर्जाची मर्यादा वाढवून एक लाख रुपयेकरण्यात आली होती.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांमधून स्वतःचे आधार कार्ड तसेच रेशन कार्ड सोबत जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह एक विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा लागतो. या योजनेसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
या योजनेअंतर्गत खालील व्यवसायांना दिले जाते कर्ज
सायबर कॅफे,संगणक प्रशिक्षण,झेरॉक्स व स्टेशनरी,हेअर सलून, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिरची कांडप उद्योग, वडापाव उद्योग, भाजीपाला विक्री केंद्र, ऑटो रिक्षा, चहा विक्री केंद्र, डीटीपी वर्क, स्वीट मार्ट, ड्रायक्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टिट्यूट, ऑटो रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग अंड गॅरेज, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर दुरुस्ती, चिकन आणि मटन शोप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रीम पार्लर व इतर, मासळी विक्री, भाजीपाला व फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटेसे दुकान, टेलिफोन बूथ, हार्डवेअर व पेंट शॉप, मत्स्यव्यवसाय, कृषी क्लिनिक, पावर टिलरइत्यादी व्यवस्था या योजनेसाठी पात्र आहेत.
मिळणार्या कर्जावरील व्याज(Intrest Rate)
दुकानासाठी एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनांतर्गत दिले जाते. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला एक लाख रुपयांच्या कर्जासाठी 2048 पाच समान 48 हप्ते दिले जातात.प्रत्येक महिन्याला हे कर्ज परतफेड करायची असते.जर नियमितपणे हे कर्ज परतफेड केली तर कुठल्याही प्रकारचा व्याज घेतले जात नाही.परंतु कर्जाची नियमित परतफेड केली नाही तर दंडात्मक व्याज घेतले जाते.
अर्ज करण्याची पद्धत(Process Of Application)
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघा पद्धतीने अर्ज करू शकतात. जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड, रेशन कार्डमहामंडळाच्या कार्यालयात अर्ज घेऊन अर्ज करू शकतात. त्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांना सुद्धा कर्ज नियमित परतफेड केलेल्यांना 50 टक्के व्याजमाफी देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी ओटीएस योजना सुरू आहे याचा लाभ घेता येऊ शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता(Elagibility For Scheme)
1- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
3- लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असावे.
4- वेब पोर्टल/महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
5- उमेदवाराने अर्ज करताना या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्याकिंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
6-उमेदवार कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
7- उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरणहाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
8-कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
1- अर्जदाराच्या आधार कार्ड
2- पॅन कार्ड
3- बँकेचे पासबुक
4- जातीचा दाखला
5- रेशन कार्ड
6- प्रोजेक्ट रिपोर्ट
7- पासपोर्ट साईज फोटो (स्रोत-मीEशेतकरी)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Pm Kisan Yojana: पीएम किसानचा हफ्ता यामुळे जाऊ शकतो लांबणीवर; वाचा सविस्तर
Share your comments