1. यांत्रिकीकरण

Agri Machinary: या '2' कृषी यंत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीकामात होईल मदत, वाचेल वेळ आणि पैसा

शेतीच्या कामांमध्ये मदतगार ठरतील असे अनेक प्रकारचे कृषी यंत्र आणि उपकरणे आली असून त्याचा उपयोग केला जात आहे. या यंत्राच्या साहाय्याने वेळेत बचत होऊन कामअगदी लवकर पूर्ण होते आणि खर्च देखील कमी लागतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this is to machi give more benifit to farmer in farming save time and money

this is to machi give more benifit to farmer in farming save time and money

शेतीच्या कामांमध्ये मदतगार ठरतील असे अनेक प्रकारचे कृषी यंत्र आणि उपकरणे आली असून त्याचा उपयोग केला जात आहे. या यंत्राच्या साहाय्याने वेळेत बचत होऊन कामअगदी लवकर पूर्ण होते आणि खर्च देखील कमी लागतो.

आजच्या आधुनिक युगात विविध प्रकारचे शेतीत उपयोग करणारे यंत्र आणि उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. या लेखामध्ये आपण कमी किमतीत शेतीत सहाय्यभूत करणाऱ्या दोन यंत्राविषयी माहिती घेणार आहोत.

 शेतीत उपयोगी येणारे दोन महत्वपूर्ण यंत्र

1- मूव्हर्स अँड ट्रिमर- मूव्हर्स गवत कापण्यासाठी उपयोगाचे मशीन असून या मशीनचा उपयोग बागकामाचा उद्देशाने केला जातो. गवताला एका विशिष्ट उंची नुसार या मशिनद्वारे कापता येते. आपण बऱ्याचदा लॉन पाहतो तेथील गवताची कटाई किती सुंदर पद्धतीने केलेली असते. या मशिनच्या साह्याने मुळांपासून गवत कापले जात नाही. मूव्हर्स दोन प्रकारच्या असून त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे पुश मूवर्स आणि दुसरा प्रकार म्हणजे इलेक्ट्रिक घास मुवर्स होय.याच्या साहाय्याने ट्रिमर चा उपयोग बागकामाचा उद्देशाने केला जातो. 1 स्ट्रीग ट्रिमर लॉन ची साफसफाई करण्यासाठी आहे आणि हेज ट्रिमर चा वापर हा हॅज ला ट्रिम करण्यासाठी आणि एक व्यवस्थित आकार देण्यासाठी केला जातो

2- पावर रिपर- हे एक शेती मध्ये वापरले जाणारे यंत्र असून पिकांची कापणी करते आणि कापणी झाल्यानंतर कापलेल्या पिकाच्या पेंड्या बांधण्यासाठी उपयोगात आणले जाते.

मुख्यतः याचा उपयोग अन्नधान्य पिके आणि गवताच्या कापणीसाठी केला जातो. हे एक तंत्रज्ञानाने युक्त उन्नत यंत्रसामग्री असून शेतामध्ये अगदी सहजतेने कार्य करण्यासाठी निर्माण केली गेली आहे. शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे पावर रीपर यंत्र उपलब्ध आहे.

 पावर रिपर मशीन चे प्रकार

1- ट्रॅक्टर चलीत रिपर बाईंडर

2- स्वयंचलित वर्टीकल कनव्हेयर रिपर

3- ट्रॅक्टर चलित रीपर

4- स्वयंचलित रिपर बाईंडर

 या मशिन ची वैशिष्ट्ये

1- या मशीनचा उपयोग गहू, धान, कोथिंबीर, ज्वारी इत्यादी पिकांच्या कापणीसाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो.

2- या यंत्राचे ब्लेड बदलून मक्याचे पीक देखील कापता येते.

3- हे सगळे मशीन डिझेलवर चालणारी असून अगदी कमी डिझेलच्या वापरात चांगले काम करते. एका एकर काम करण्यासाठी अर्धा लिटर डिझेलपुरेसे ठरते.

4- ज्या ठिकाणी मजूर टंचाई आहे शिवाय कामात मजुरांवर जास्त खर्च होतो. अशा कामांमध्ये रीपर मशिनचा वापर खूप उपयुक्त ठरतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार 2 हजार; पण 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत

नक्की वाचा:Business Idea: कमी गुंतवणूकीत सुरु करा 'हा' व्यवसाय अल्प कालावधीतचं मिळणार लाखोंचा नफा; वाचा

नक्की वाचा:डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी राबवत आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम दुधापासून बनवत आहेत विविध पदार्थ.

English Summary: this is to machi give more benifit to farmer in farming save time and money Published on: 12 May 2022, 01:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters