1. यांत्रिकीकरण

यंत्रदुनिया! मल्टीक्रॉप थ्रेशर आणि कम्बाईन हार्वेस्टर ही दोन यंत्रे करतील पिकाची काढणी आणि धान्याची साफसफाई

खरीप हंगाम असो की रब्बी हंगाम पिकांच्या कापणी आणि काढणीसाठी यंत्रांची आवश्यकता भासते. याच गोष्टीला लक्षात ठेवून बाजारामध्ये विविध प्रकारच्या भुसा करणाऱ्या यंत्रांची गर्दी होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
multicrop thresher and combined harvester this machin useful for crop harvesting

multicrop thresher and combined harvester this machin useful for crop harvesting

 खरीप हंगाम असो की रब्बी हंगाम पिकांच्या कापणी आणि काढणीसाठी यंत्रांची आवश्यकता भासते. याच गोष्टीला लक्षात ठेवून बाजारामध्ये विविध प्रकारच्या भुसा करणाऱ्या  यंत्रांची गर्दी होत आहे.

या यंत्रांचा वापर करून शेतकरी पिकांच्या अवशेषांचा भुसा अगदी सहजतेने बनवू शकतात. तसेच अगदी कमी श्रमात आणि कमीत कमी करतात हे काम अगदी सहजतेने पूर्ण करता येते. आपण या लेखांमध्ये पिकांच्या कापणीसाठी शेतकऱ्यांना उपयोगी येणारे दोन महत्त्वाचे यंत्रांची माहिती घेणार आहोत.

 पिकांच्या कापणी आणि काढण्यासाठी उपयुक्त यंत्र

1- कम्बाईन हार्वेस्टर मशीन- बहुपयोगी व प्रगत कृषी उपकरण असून उभी पिके जसे की गहू, धान, हरभरा, मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल तसेच मूग  या पिकांची कापणी, काढणे आणि धाण्याची  सफाई करण्यासाठी कामात येते. या यंत्राचा वापर करण्यामुळे वेळेत बचत तर होतेच परंतु कष्ट देखील कमी लागतात. शेतकरी या यंत्राचा वापर शेतीमध्ये सुलभतेने करून नफ्यात वाढ करू शकतात. या यंत्रामध्ये दोन प्रकार असून एक स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर आणि दुसरे ट्रॅक्‍टरचलित कम्बाईन हार्वेस्टर होय. स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर यंत्रामध्ये सर्व मशिनरी फिट असते. ही मशिनरी स्वतःच्या शक्तीद्वारे इंजन व अन्य भागांना संचालित करते. ज्याद्वारे पिकांची कापणी, काढणी आणि दाण्याची सफाई चे काम अगदी सुलभतेने होते. त्यासोबतच ट्रॅक्‍टरचलित कम्बाईन हार्वेस्टर यंत्राला ट्रॅक्टर ला जोडून चालवले जाते. हे मशीन ट्रॅक्टरच्या पीटीओ द्वारे संचालित होते. ट्रॅक्टर ला कम्बाईन हार्वेस्टर सोडून पिकांची कापणी केली जाते. हे यंत्र पिकाला जास्त वरच्या बाजूने कापते आणि त्यानंतर एकाच्या उरलेल्या भागाचा भुसा बनवला जातो.

कम्बाईन हार्वेस्टर मशीन चे फायदे

या मशिनच्या साह्याने पिकाची काढणी,कापणी आणि धान्याचे सफाई ही काम एका वेळेस होतात. या यंत्राद्वारे ही काम करण्यासाठी खूप कमी खर्च आणि वेळ कमी लागतो. कम्बाईन हार्वेस्टर मशीन द्वारे पिकांची कापणी केली तर पिकांचे अवशेष शेतामध्ये राहतात. ही आवशेष शेतात कुजल्यानंतर खतांमध्ये रूपांतरित होतात. मजुरांची टंचाई असेल तर अगदी वेळेत पिकांची कापणी आणि काढणी करण्याचे काम या यंत्राच्या साहाय्याने होते त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते.

2- मल्टीक्रॉप थ्रेशर- मल्टी क्रॉप शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर मशीन आहे. मल्टी क्रॉप थ्रेशर मशीन च्या साहाय्याने गहू, मोहरी, सोयाबीन, तुर, बाजरी, मका, डॉलर हरभरा, साधा हरभरा, इसबगोल, मसूर, राई, भुईमूग इत्यादी पिकांचे दाणे  स्वच्छ पद्धतीने काढले जातात. या मशीनच्या साहाय्याने पिकांचे दाणे आणि भुसा वेगळा केला जातो.

 मल्टीक्रॉप थ्रेशर मशीनची वैशिष्ट्ये

 एक आधुनिक तंत्रज्ञान बनवले गेलेले मशीन असून या मशिनच्या साह्याने वेगवेगळ्या प्रकारचे काम एकावेळेस केले जातात. जसे की पिकांच्या कापणीनंतर धान्याची काढणी आणि  निर्माण झालेला भुसा वेगळा केला जातो.

हे यंत्र हलके असून याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणे अगदी सोपे आहे. या यंत्राच्या वापरामुळे वेळेत, मजुरीत आणि पैशात बचत होते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Weather Forecast: कसं असेल आज महाराष्ट्राचं हवामान; वाचा सविस्तर

नक्की वाचा:Kidney Racket : धक्कादायक : रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट; 15 जणांवर गुन्हा दाखल

नक्की वाचा:Weather Update : राज्यातयाठिकाणी पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज; जाणून घ्या पुढील तीन दिवसाचे हवामान...

English Summary: multicrop thresher and combined harvester this machin useful for crop harvesting Published on: 12 May 2022, 01:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters