चांगल्या भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. माहितीनुसार सरकार सप्टेंबरच्या महिन्यात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनाच्या (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदरात बदल करण्याची तयारी करत आहे.
30 सप्टेंबर रोजी व्याजदरांचा आढावा
स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमवरील (Small Savings Scheme) व्याजदरांचा आढावा 30 सप्टेंबरला होणार आहे. हा आढावा ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तीन महिन्यात घेतला जाणार आहे. यावेळी सरकारकडून बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.
खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीचे नियोजन करा तंत्र पद्धतीने; चांगल्या उत्पादनासाठी होणार मदत
व्याजदर बदलणार
बँका आणि आरबीआय दोन्ही सरकारच्या लहान बचत योजनांवर (Small Savings Schemes) व्याज वाढवण्याच्या बाजूने आहेत. RBI ने मे पासून रेपो दरात तीनदा वाढ केली आहे आणि सध्या तो 5.4% वर चालू आहे. येत्या काळात त्यात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची अपेक्षा आहे.
परंतु सरकारने बचत योजनांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. अशा परिस्थितीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील परतावाही वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना नक्कीच होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार 20 लाख रुपये
व्याजदर दर तीन महिन्यात सुधारित करतात
अल्पबचत योजनांवरील व्याजाचे सरकार दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. यादरम्यान, व्याजदर वाढवायचे, कमी करायचे की स्थिर ठेवायचे याचा निर्णय घेतला जातो. हे व्याजदर अर्थ मंत्रालय ठरवतात.
या योजनांवरील व्याज
PPF वर वार्षिक 7.1% दराने व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करणाऱ्यांना 7.6% वार्षिक परतावा दिला जातो. तसेच नॅशनल सेव्हिंग्ज (National Savings) रिकरिंग डिपॉझिट खात्याबद्दल पाहिले, तर त्याचा परतावा 5.8% आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या
गणपतीत 'या' लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार; कारण बाप्पाची असते विशेष कृपा
ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; असे करा नियंत्रण
शेतकऱ्यांचे अच्छे दिन; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तुरीचे दर वाढणार 3 हजार रुपयांनी
Share your comments