केंद्र सरकार आणि राज्य सरकार (central and state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजना लाभ देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी घेत आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजना देशातील सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी योजना आहे. विशेष म्हणजे देशातील 10 कोटींहून अधिक लोकांच्या उपयोगी ही योजना पडत आहे. आतापर्यंत केंद्रीय कृषी (Central Agriculture) आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत 11 हप्ते जमा केले आहेत.
आता शेतकरी 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. माहितीनुसार 12 वा हप्ता जमा करण्याची सर्व प्रक्रिया झाली आहे. फक्त शिक्कामोर्तब करणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशीही हप्ता जमा केला जावू शकतो.
डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..
या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
माहितीनुसार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला (Ministry of Farmers Welfare) लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात 12 व्या हपत्याचे पैसे जमा करायचे आहेत. यासाठी जवळपास सर्व तयारी सुरू झाली आहे.
माहितीनुसार मंत्रालय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. महत्वाचे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत 12 वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणारे लोक जगतात राजासारखे जीवन; तुमच्या कुंडलीत आहे?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 12 व्या हपत्याचे पैसे मंत्रालय शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीच्या अगोदर पाठवण्याची शक्यता आहे. मात्र, नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांच्या पडताळणीची प्रक्रिया (Verification process) सुरू असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपूर्वी म्हणजेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतीलच, अशी तयारी सरकारकडून सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
कौतुकास्पद! तब्बल 250 एकरवर गवती चहाची लागवड; 80 शेतकरी घेत आहेत लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन! उडीदाला मिळतोय 10 हजारांवर बाजारभाव
26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात यलो अलर्ट जारी
Share your comments