मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, यामध्ये Pm Kisan Yojana ही एक महत्वाची योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून २ हजार रुपये दिले जातात. एका वर्षात याचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. नुकताच याचा ११ व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला, अनेक दिवसांपासून याची प्रतीक्षा शेतकरी करत होते.
शेतकऱ्यांच्या (Farmer) समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पीएम किसान योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सुरू केली होती. हे सहा हजार 2000 चा एक हफ्ता याप्रमाणे तीन हफ्त्यातं दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हफ्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. मात्र यामध्ये अनेकदा बदल करण्यात आले आहेत.
मागील 31 मे रोजी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. असे असताना काही अडचणींमुळे अजूनही काही शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत ते 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून नेमकी काय अडचण आहे, याची विचारणा तुम्ही करू शकता.
मोठी बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी, अमूल ग्रुपने घेतला मोठा निर्णय..
तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेच्या नियमात बसत असाल, तर तुम्ही PM किसान योजनेच्या www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेची माहिती मिळवू शकता. पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, या किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC करणे आवश्यक गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी हे काम अजूनही केले नाही.
दारू पिल्यावर तो व्यक्ती इंग्रजी संभाषण का करतो, जाणून घ्या खरे कारण..
यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने हे केले नाही तर त्याला योजनेचे पैसे दिले जाऊ शकत नाहीत. 11 वा हप्ता देखील मिळणार नाही. तर नक्कीच या योजेनेच लाभ घ्या आणि मिळवा लगेचच 11 हप्ता. निश्चितच पीएम किसान सम्मान निधि योजना साठी पात्र शेतकर्यांना यामुळे आता आपल्या हफ्त्याची स्थिती जाणून घेण्यास अजूनच सोपे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेती हा बांधावरुन करण्याचा विषय नाही तर..., बिजमाता राहिबाईंचा मोलाचा सल्ला
सरकारकडून महिलांना मोफत मिळत आहेत शिलाई मशीन, जाणून घ्या पात्रता..
कांद्याचा नाशिकमध्ये वांदा, शेतकरी म्हणाले कांद्यासाठी पुणे मार्केटच लय भारी..
Share your comments