केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. विशेष म्हणजे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस (shinde-fadanvis) सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे.
केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात आता 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत (scheme) पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर
या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या निकषांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी २०१८ मध्ये केंद्र सरकारकडून (central government) पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे.
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; मिळतोय 'इतका' दर
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये (thousand) जमा करण्यात येतात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये या पैशांचे शेतकऱ्यांना वितरण केले जाते. अशा प्रकारची योजना लवकरच महाराष्ट्रात राज्य सरकारकडून (state government) लागू केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो किसान क्रेडिट कार्ड मिळवा घरबसल्या; जाणून घ्या सोपा मार्ग
काय सांगता! या 4 योजनांमध्ये गुंतवणूकदारांना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळतो
सावधान! लंपी स्किन आजारामुळे जनावरांच्या जीवाला पसरतोय धोका; रोखण्यासाठी करा 'हे' उपाय
Share your comments