शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून मोदी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे हा यामागचा हेतू होता. असे असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) ही एक महत्त्वाची योजना आहे. यामध्ये लावलेल्या नियमात बसलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
मोदी सरकारकडून ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. असे असताना यामध्ये देखील गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसून आले. यासंदर्भांत आता एक नवी माहिती समोर आली आहे. यामध्ये तब्बल 9,000 पेक्षा अधिक मृत शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसनाची रक्कम जमा झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील 9,000 हून अधिक मृत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे. यामुळे ही एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने कृषी विभागाला लाभार्थ्यांची माहिती घेण्यास सांगितले तेव्हा यातील त्रुटी लक्षात आली. यामुळे सध्या त्यांना यातून वगळ्यात येणार आहे. यामध्ये PM किसानचे पैसे किमान 9,284 मृत शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत.
आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..
आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तसेच कुटुंबांना वसुलीच्या नोटिसाही पाठवल्या जात आहेत. याबाबत कृषी अधिकारी हरनाथ सिंह म्हणाले की, यामध्ये नोंदणीकृत शेतकरी सुमारे ९६ हजार असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, महसूल विभागाची पथकेही मृत शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करत आहेत.
शेतपंप चोरणारांच्या मुसक्या वालचंदनगर पोलिसांनी आवळल्या, सणसरमधून चोरट्यांना अटक
दरम्यान या मृत शेतकऱ्यांची ओळख पटताच त्यांची नावे यादीतून काढून टाकली जाणार आहेत. यामुळे आता ज्या कुटुंबांना या योजनेतून चुकीच्या पद्धतीने पैसे (PM Kisan) मिळाले आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. यामुळे याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. देशात अनेक राज्यात हीच परिस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या;
इंदापूरमध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान, 40 मेंढ्या अस्वस्थ
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार
निवडणुक हरल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, राजकारणासाठी गेला जीव...
Share your comments