जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरू शकते. म्हातारपणात पैसा (money) हा मोठा आधार असतो. अशा वेळी तुम्हाला भारत सरकारची प्रधानमंत्री वय वंदना योजना खूप उपयोगी ठरू शकते.
वयाच्या 60 व्या वर्षी किंवा त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेता येईल. ही एक पेन्शन योजना आहे, जी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाते. ही योजना भारत सरकारने 26 मे 2020 रोजी सुरू केली होती.
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ती ३१ मार्च २०२३ पर्यंत कधीही निवडू शकता. प्रधानमंत्री वय वंदना योजना मधील तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित व्याज आहे. ज्याच्या आधारावर तुमचे मासिक पेन्शन ठरवले जाते.
शेतकरी मित्रांनो वासरांची वाढ 'या' कारणाने खुंटते; घ्या अशी काळजी
प्रधानमंत्री वय वंदना योजना काय आहे?
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही भारतातील वृद्ध लोकांसाठी आहे, ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा नाही. PMVVY अंतर्गत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. रक्कम एकरकमी जमा करावी लागेल.
जर पती-पत्नी दोघांनाही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर दोघेही १५ लाख रुपयांपर्यंत स्वतंत्रपणे जमा करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा चांगले व्याज मिळते. पेन्शन तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या आधारावर ठरवली जाते.
10 वर्षांनंतर पैसे परत
प्रधानमंत्री वय वंदना योजना 10 वर्षांसाठी आहे. तोपर्यंत तुमचे पैसे योजनेत जमा होतील आणि तुम्हाला पेन्शन मिळत राहील. ही रक्कम 10 वर्षांनंतर पेन्शनच्या अंतिम पेमेंटसह परत केली जाईल.
या योजनेत गुंतवलेल्या रकमेवरील व्याज दर वार्षिक ७.४० टक्के असेल, जे दरमहा पेन्शन म्हणून दिले जाईल. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही योजना सुरू झाल्यानंतर कधीही या योजनेतून सरेंडर करू शकता.
महत्वाचे! PM आवास योजनेअंतर्गत घर मिळाले नसेल तर 'या' नंबरवर करा कॉल
तुम्हाला किती पेन्शन मिळेल
या योजनेत किमान मासिक पेन्शन रुपये 1000 आणि कमाल 9250 रुपये आहे. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर 7.40 टक्के दराने वार्षिक व्याज 111,000 रुपये होईल. जर ते 12 भागांमध्ये विभागले गेले तर 9250 रुपये मासिक पेन्शन मिळेल.
आयकर कायदा 1961 च्या कलम 80C योजनेंतर्गत जमा केलेली एकरकमी रक्कम करमुक्त आहे. परंतु गुंतवलेल्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजावर लाभार्थीला कर भरावा लागेल.
अर्ज कसा करायचा
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, एखाद्याला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही ऑफलाइन देखील अर्ज करू शकता. पेन्शनचा पहिला हप्ता तुमच्या गुंतवणुकीच्या तारखेपासून एक महिना, तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्षानंतर मिळेल.
तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शनसाठी कोणता पर्याय निवडला आहे यावर ते अवलंबून आहे. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर आधारित तुम्हाला पेन्शन दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या
सावधान! आज आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; गुंतवणूकदारांचे पैसे होतात दुप्पट
कांदा उत्पादक शेतकरी संकटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला 'हा' निर्णय
Share your comments