केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हे शेतकऱ्यांनी विविध फळबाग किंवा फूल पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते. यामध्ये संबंधित फळांचे किंवा फुल पिकांचे उत्पादन वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवरच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 या योजनेच्या माध्यमातून परदेशी फळ लागवड आणि त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
जे शेतकरी विदेशी फळे, फुले तसेच मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन इत्यादी घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. तसेच तुम्हाला या योजने विषयी अधिक माहिती हवी असेल तर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे.
विदेशी फळबाग लागवड अनुदान
आपल्याला माहित आहेच कि विदेशी फळे पिकांमध्ये किवी, ड्रॅगन फ्रुट तसेच अंजीर या सारख्या पदार्थांचा समावेश होतो.
या विदेशी फळपिकांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा ही चार लाख रुपये आहे तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान यामध्ये आहे. तुम्हाला स्ट्रॉबेरी फळबाग लावायचा असेल तर यासाठी खर्च मर्यादा दोन लाख 80 हजार रुपये असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार रुपये अनुदान यामध्ये देय आहे.
त्यासोबतच ड्रॅगन फ्रुट,अवॅकॅडो, ब्लूबेरी इत्यादी फळपिकांसाठी प्रति हेक्टरी खर्चाची मर्यादा एक लाख रुपये निश्चित केली असून यापैकी एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये अनुदान या योजनेमार्फत देण्यात येणार आहे.
Share your comments