जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक (safe investment) करायची असेल आणि चांगला परतावा हवा असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आपण अशाच एका योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आपण पोस्ट ऑफिसच्या (post office) मुदत ठेवी योजनेबद्दल बोलत आहोत. या सरकारी योजनेत पैसे गुंतवण्यात कोणताही धोका नाही. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.
पोस्ट ऑफिसमधून मुदत ठेवीचा लाभ देखील मिळतो आणि चांगला परतावा मिळण्याची हमीही असते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 1 ते 5 वर्षांपर्यंत मुदत ठेव उघडू शकता. ही एक लहान बचत योजना आहे.
1 लाख गुंतवणुकीवर 1,39,407 रुपये मिळवा
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटवर 5 वर्षांसाठी 6.7% प्रति वर्ष मिळतात. याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवीमध्ये 1 लाख रुपये जमा करून खाते उघडले, तर 5 वर्षानंतर, त्याला TD च्या व्याजदरानुसार 1,39,407 रुपये मिळतील. त्याच वेळी, एक वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर वार्षिक 5.5% आहे.
कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगार
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?
पोस्ट ऑफिसच्या (post office) मुदत ठेव योजनेत कोणताही भारतीय एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकतो. ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ते मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ते देखील त्यात खाते उघडू शकतात.
खाते उघडण्यासाठी तुम्ही त्यात 1000 रुपयांपासून कोणतीही रक्कम टाकू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस TD मध्ये 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.
मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध; पालनाने शेतकरी होणार श्रीमंत
6 महिन्यानंतर योजना बंद करू शकता
6 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही योजना बंद करू शकता. दुसरीकडे, खात्याचे १२ महिने पूर्ण होईपर्यंत तुम्ही ६ महिन्यांनंतर टीडी बंद केल्यास, टर्म डिपॉझिटवर (Term Deposit) नव्हे तर पोस्ट ऑफिस बचत योजनेचा व्याजदर लागू होईल.
महत्वाच्या बातम्या
पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली; भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
शरीरासोबत मनाचंही आरोग्य उत्तम ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवा फक्त ४ सूत्रं
ज्वारी-बाजरी आणि इतर तृणधान्यांसाठी देशात 3 केंद्रे स्थापन; शेतकऱ्यांना होणार फायदा
शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी
Share your comments