केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना. आजची बातमी सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची आहे.
पीएम किसान योजनेखाली सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. परभणी येथे (lifestyle) शेतमालाच्या नुकसान भरपाई जिल्ह्यातील तालुक्यांतील ८ मंडलांतील ७३ हजार ८१४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रिम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार एवढी रक्कम
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपन्यांकडून सुरुवात झालेली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील ८ महसूल मंडलांत २१ ते २६ दिवस पावसाचा दीर्घ खंड पडला होता. त्यामुळे राज्य शासनाचे अधिकारी विमा, कंपनीचे प्रतिनिधी यांनी सोयाबीन पीक परिस्थितीची संयुक्त पाहणी केली.
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मंडलातील सोयाबीनच्या यावर्षीच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यात झरी (ता. परभणी) मंडलात ५२ टक्के, सिंगणापूर (ता. परभणी) मंडलात ५३ टक्के, जांब (ता. परभणी) मंडलात ५३ टक्के, दूधगाव (ता. जिंतूर) मंडलात ५५ टक्के, रामपुरी (ता. मानवत) मंडलात ५३ टक्के, सोनपेठ (ता. सोनपेठ) मंडलात ५४ टक्के, माखणी (ता. गंगाखेड) मंडलात ५४ टक्के, चुडावा (ता. पूर्णा) मंडलात ५७ टक्के घट झाली.
त्यामुळे पीकविमा योजनेतील प्रतिकूल परिस्थितीमुळेळे झालेले नुकसान या जोखीम बाबींअंतर्गत या 8 मंडलांतील शेतकऱ्यांना संभाव्य विमाभरपाई पैकी २५ टक्के अग्रिम रक्कम एक महिन्याच्या आत देण्यात यावी अशी यादी सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ९ सप्टेंबर रोजी दिली होती. आता ही रक्कम वाटण्यास सुरुवात केली आहे.
कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
विमा रक्कम मंजूर
8 मंडलांतील विशेषता सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व ७३ हजार ८१४ शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रिम विमा भरपाई मंजूर करण्यात आली. संबंधित मंडलातील विमाधारक (lifestyle) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' राशींना लाभेल भाग्याची खास साथ; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
धक्कादायक! बनावट खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल
दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलासा; 'या' जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटींचे प्रोत्साहन अनुदान
Share your comments