पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कोरोना काळात गरीब कल्याण अन्न योजनांच्या अंतर्गत गरजूंना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र आता या योजनेची अंतिम तारीख जवळ आली आहे.
सरकार या योजनेला मुदतवाढ देण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार (Central government) बफर स्टॉकची स्थिती आणि खरीप पेरणीचा आढावा घेऊन या महिन्यांच्या शेवटी ही योजना वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सोयाबीनच्या बाजारभावात चढ की उतारा? वाचा आजचे सोयाबीनचे दर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर धान्यसाठा पुरेसा असेल. तसेच खरीप पेरणी क्षेत्रात घट झालेली नसेल तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ दिली जाऊ शकते. या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोम्बर महिन्याच्या (October) सुरुवातीला याबाबद निर्णय घेण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका! बटाटा-टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या दर
इतके मिळते रेशन
गरीब कल्याण अन्न योजनेतर्गंत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि १ किलो हरभरा मोफत दिला जातो. हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आधीच उपलब्ध केलेल्या अनुदानित रेशनच्या अतिरिक्त धान्य पुरवठा (grain supply) आहे. मार्चमध्ये या योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता.
कमी पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात पेरणी सुमारे ६ टक्क्यांनी कमी झाली आहे. भात पेरणी ३६७.५५ लाख हेक्टरवर झाली आहे. अशा परिस्थितीत कोणतेही धान्यवाटप सध्याच्या स्टॉकमधून केले जाणार आहे. त्यामुळे बफर स्टॉक (Buffer stock) कमी होत असल्याची सरकारला चिंता आहे. याबाबद निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
जनावरांचे दूध वाढविण्यासाठी 'हे' घरगुती उपाय आवश्यक
पोस्ट ऑफिससोबत सुरू करा 'हा' व्यवसाय; छोट्या गुंतवणुकीत मिळणार चांगला नफा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उडीदाचे भाव तेजीत, आता सरकारही करणार उडिदाची खरेदी
Share your comments