1. सरकारी योजना

शेतकऱ्यांनो आता आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातही विका! वाहतुकीसाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान

शेतकरी (farmers) उत्पादक कंपन्यांना अनेक वेळा वाहतूक खर्च परवडत नसल्याने नाशवंत शेतमाल (Perishable agricultural products) परराज्यात पाठविण्यास अडचणी निर्माण होतात.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Farmers agricultural produce

Farmers agricultural produce

शेतकरी (farmers) उत्पादक कंपन्यांना अनेक वेळा वाहतूक खर्च परवडत नसल्याने नाशवंत शेतमाल (Perishable agricultural products) परराज्यात पाठविण्यास अडचणी निर्माण होतात.

या अडचणी लक्षात घेत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत (Maharashtra State Board of Agricultural Marketing) 'रस्ते वाहतूक अनुदान योजना' राबविण्यात येत आहे. ही योजना आंबा, केळी, डाळींब, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले व भाजीपाला या नाशवंत पिकांसाठीच लागू आहे.

या योजनेमध्ये रस्तेमार्गे प्रत्यक्ष वाहतूक होणार्‍या शेतमालावर अनुदान (Subsidy on agricultural produce) देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना आणि या योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी माहिती जाणून घेऊया.

Use Fertilizers: शेतकरी मित्रांनो खते वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान

या योजनेअंतर्गत वाहतूक अंतरानुसार अनुदान

१ ) किमान ३५० ते ७५० कि. मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल मर्यादा रु.२०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

२ ) ७५१ ते १००० कि.मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल मर्यादा रु.३०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

३ ) १००१ ते १५०० कि.मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल मर्यादा रु.४०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

४ ) १५०१ ते २००० किमी.पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल मर्यादा रु.५०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

५ ) २००१ कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वाहतूक खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल मर्यादा रु.६०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

६ ) सिक्कीम, आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यासाठी वाहतूक खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल मर्यादा रु.७५,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

Walnut Cultivation: अक्रोडाच्या लागवडीतून शेतकरी होतील करोडपती; जाणून घ्या संपूर्ण पद्धत

लाभ

या योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतमाल (Agricultural goods) उत्पादक सहकारी संस्था/उत्पादक कंपनीस एका आर्थिक वर्षात कमाल रू.३.०० लाख एवढे वाहतूक अनुदान देय आहे. हे अनुदान फक्त महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकेरी वाहतूकीस लागू आहे.

परराज्यात शेतमाल पाठवित असताना १ कन्साईनमेंट मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company) / संस्थेच्या किमान ३ उत्पादक शेतकरी सभासदांचा शेतमाल एकत्रितपणे पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधा.

महत्वाच्या बातम्या 
ई-पीक पाहणीच्या नवीन अ‍ॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
Horoscope: 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश; वाचा आजचे राशीभविष्य
शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या

English Summary: Farmers subsidy inter-state transport agricultural produce Published on: 19 August 2022, 10:39 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters