सर्वसामान्य लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिवाळीत खाद्य पदार्थाच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे आता ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Consumer Affairs) महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्र सरकारने (central gov) डाळींच्या किमती नियंत्रित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे, असे जारी केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. बाजारभावापेक्षा 8 रुपये किलोने स्वस्त असलेली डाळ राज्यांना दिली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. या निर्णयाने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे.
बापरे बाप! तब्बल 10 कोटींची म्हैस; पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
सध्या सरकारकडे 43 लाख टन डाळींचा साठा आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना 88 हजार टन डाळींचा पुरवठा केला आहे. दिवाळीला भाव वाढणार नाहीत, असा विश्वास देखील सरकारने दिला आहे.
डाळींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता मसूरचा एमएसपी 5500 रुपये प्रति क्विंटलवरून 6000 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
आता लाइटचे नो टेंशन! फुकटात वीज निर्माण करणारा जनरेटर लॉन्च, होणार असा फायदा
भारताकडून डाळींची आयात
2022-26 या कालावधीत प्रत्येक आर्थिक वर्षात म्यानमारमधून 2,50,000 मेट्रिक टन उडीद आणि 1,00,000 मेट्रिक टन तूर आयात केली जाणार आहे. भारत पुढील 5 आर्थिक वर्षांत मलावीतून 50,000 मेट्रिक टन तूर आयात करेल. विशेष म्हणजे सरकारने 2022-26 या कालावधीत खाजगी व्यापाराद्वारे मोझांबिकमधून दरवर्षी 2,00,000 मेट्रिक टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरुवात
‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंददायी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
तब्बल 10 लाख शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम रखडली; शेतकरी प्रतीक्षेत
Share your comments