केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. तसेच सर्वसामान्य लोकांसाठी व शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभ देखील देण्याचा प्रयत्न केला जातो. आता बिहारमधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी मोठी घोषणा केली आहे.
दुष्काळामुळे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी प्रती लीटर डिझेलमागे 60 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. 19 जुलै मंगळवारी त्यांच्या मंत्रिमंडळाने याचा निर्णय घेतला. आकस्मिक निधीसाठी बिहार सरकार २०२२-२३ मध्ये सुरुवातीला २९ कोटी ९५ लाख रुपये खर्च करणार आहे.
मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60% अनुदान ; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ
१० लीटरसाठी ६०० रुपयांचे अनुदान
शेतकऱ्यांना शेतीसाठी (agriculture) एकरी १० लीटर डिझेल अनुदानातून दिले जाणार आहे. या १० लीटरसाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एवढेच नाही तर तागाच्या शेतीसाठी सिंचन करण्यासाठी प्रति एकर १२०० रुपये दिले जाणार आहेत. यानुसार अधिकाधिक प्रति एकर १८०० रुपये दिले जाणार आहेत.
बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (agriculture) सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा (grant) लाभ मिळणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने शेतकऱ्यांसाठी डिझेल अनुदान योजना सुरू केली आहे.
होय खरंय ! आता शेतकऱ्यांना स्वस्त मिळणार कृषी यंत्रे; केंद्र सरकारकडून अँप लाँच
बिहार सरकारच्या कृषी विभागाने सिंचनासाठी डिझेलवर (Diesel) दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी वेबसाईट जारी केली आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी (farmers) कृषी अधिकाऱ्यांची भेट घेवू शकतात. या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रतिलिटर 60 रुपये अनुदान देणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Ration Machine : बापरे बाप ! आता एटीएम मधून मिळणार गहू, तांदूळ ; ग्राहकांना मिळणार रेशन मशीन
ऐकलंत का ! 'या' शेतकऱ्यांना दिले जाणार 'इतके' अनुदान ; खात्यावर होणार रक्कम जमा
शेतकऱ्यांचे आले सुगीचे दिवस ! गेल्या 6 आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्यांनी वाढ..
Share your comments