सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असतं. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घोषणेनुसार आता राज्यात 'एक दिवस बळीराजासाठी' ही संकल्पना (concept) राबवण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Minister of Agriculture abdul sattar) हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे (natural calamities) होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे".
Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये
तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी (farmers problem) या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहचणार आहेत. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही यावेळी अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम
90 दिवस विविध जिल्ह्यात मुक्काम
90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. मोहीम (concept) संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह योजनेत जमा करा 500 रुपये आणि मिळवा 40 लाख रुपयांचा लाभ
Post Office: इंडिया पोस्ट ऑफिस उघडणार नवीन 10 हजार ऑफिस; लोकांना होणार फायदा
Onion Prices Increased: कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; कांद्याच्या दरात वाढ
Share your comments