शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य म्हणून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो.
आता आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील (Vikas Patil) यांनी केले आहे.
दरम्यान, किसान सन्मान निधी योजनेतर्गंत (PM Kisan Scheme) १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते (Bank Account) अनिवार्य केलेले आहे. यामुळे याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग! मराठा समाजाला मोठा धक्का, आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा अवैध..
तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payment Bank) १ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यात यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे.
तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट कर्मचारी यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात सध्या १४.३२ लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत.
त्यामुळे या शेतकऱ्याच्या खात्यात १३ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. यामुळे शेतकऱ्याने हे काम करणे आवश्यक आहे. लाभार्थींची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी आयपीपीबी कार्यालयास याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता तर काळजीच मिटली! भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार, उन्हापासून होणार चार्ज
इतिहासात पहिल्यांदाच कारखान्याचा काटा लॉक!! पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस
आता प्रत्येकाला मिळणार घर! पंतप्रधान आवास योजनेला वाढीव निधी
Share your comments